Jos Buttler New Name: इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जोस बटलरने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बटरलने आपले नाव जोस वरून जोश (From Jos Buttler to Josh Buttler) असे करत असल्याचा व्हीडिओ इंग्लंड क्रिकेटने शेअर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) एका व्हिडिओच्या मदतीने ही घोषणा केली आहे. व्हीडिओची सुरुवात बटलरने स्वतःच्या आईसह अनेकजण गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्याचे नाव चुकीचे कसे उच्चारले जाते ते सांगितले आणि शेवटी मी माझे नाव बदलत असल्याची घोषणा त्याने केली. बटलर हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंड क्रिकेटने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये बटलर संवाद साधताना म्हणाला, “हॅलो मी इंग्लंडचा वनडे, टी-२० संघाचा कर्णधार जोस बटलर आहे. पण मला कायमच चुकीच्या नावाने हाक मारली गेली. अगदी साधारण लोकांपासून ते माझ्या आईपर्यंत आणि माझ्या वाढदिवसाच्या कार्डवरही माझ्या नावाचा चुकीचा उल्लेखच केला गेला. प्रिय जोश, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप प्रेम, आई.”

इतकेच नव्हे तर बटलरच्या एमबीईच्या मेडलवरही त्याचे चुकीचे नावच लिहिण्यात आले. व्हीडिओमध्ये कॅमेराने झुम करत ते नावही बटरलने दाखवले. पुढे तो म्हणाला, माझ्या एमबीई मेडलवरीही चुकीचे नाव आहे. त्यामुळे १३ वर्षे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आणि दोन विश्वचषक जिंकल्यानंतर, अखेर ही समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. मी आता अधिकृतपणे घोषणा करत आहे की माझे जोश बटलर असेल.”

नाव बदलण्याच्या या व्हिडिओच्या अखेरीस एकाने बटलरला जोश नव्हे तर जोस नावाने आवाज दिला, आणि हे ऐकून तो चांगलाच भडकला आणि पेन फेकून निघाला.तिथेच हा व्हीडिओ बंद होतो. पण या व्हीडिओनंतर बटलरने नक्की नाव बदललं आहे की कोणता वेगळाच प्रयोग आहे, अशी शंकाही उपस्थित होत आहे. आज १ एप्रिल असल्याने एप्रिल फुलचा प्रँक करण्यासाठी हा व्हीडीओ पोस्ट केला असावा, अशीही शक्यता आहे.

बटलर आज म्हणजेच १ एप्रिलला मुंबई इंडियन्स वि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सविरूद्ध बटरलचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. बटलरने जवळपास ७० च्या प्रभावी सरासरीसह फलंदाजी केली आहे. त्याने पाच वेळेच्या चॅम्पियन संघाविरुद्ध एक शतक आणि चार अर्धशतकांसह आठ सामन्यांत ४८५ धावा केल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या तीन डावांमध्ये बटलरने अनुक्रमे १००, ६७ आणि १८ धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jos buttler officially changes his name from jos to josh in mid of ipl 2024 england cricket made announcement with video bdg