Jos Buttler and Yuzvendra Chahal Interview: आयपीएलच्या गेल्या मोसमात उपविजेते ठरलेल्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमाची धमाकेदार सुरुवात केली आहे. राजस्थानने पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी पराभव केला. या सामन्यात सलामीवीर जोस बटलरने २० चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले आणि ५४ धावांची धडाकेबाज खेळी केली. सामन्यानंतर युजवेंद्र चहलशी बोलताना बटलरने एक खुलासा. युजवेंद्रने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना बटलर म्हणालाया डावात त्याचा आवडता शॉट खेळू शकला नाही.

सामना संपल्यानंतर जोस बटलरने सहकारी युजवेंद्र चहलशी गप्पा मारल्या. यादरम्यान चहलने त्याला त्याच्या आवडत्या शॉटबद्दल प्रश्न विचारला. ज्याच्या प्रत्युत्तरात बटलरने स्कूप शॉटला त्याचा आवडता शॉट म्हणून वर्णन केले. तो म्हणाला, “हा माझा आवडता शॉट आहे आणि मी शक्य तितक्या वेळा खेळण्याचा विचार करेन.”

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

पहिल्या सामन्यात स्कूप शॉट का खेळला नाही?

जोस बटलर पुढे म्हणाला की, “जेव्हाही मी हा शॉट खेळेन तेव्हा माझ्यात १०० टक्के आत्मविश्वास असेल, अन्यथा मी खेळणार नाही. आजच्या सामन्यात मला हा शॉट खेळावा असे वाटले नाही. कारण हा शॉट खेळता येईल अशी परिस्थिती नसल्याने मी तो खेळला नाही.”


बटलरने पहिल्याच सामन्यात ५४ धावा केल्या –

या मोसमातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्स संघासमोर एसआरएच होते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने पॉवर प्लेमध्ये वेगवान फलंदाजी केली. या सामन्यात बटलरने आयपीएल २०२३ मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. बटलरने आधी २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर ५४ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – IPL 2023: वीरेंद्र सेहवागचे ऋतुराज गायकवाडबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते की त्याला….’

युजवेंद्र चहलने ४ विकेट घेत रचला विक्रम –

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने ४ विकेट घेत आयपीएलमध्ये १७० बळी पूर्ण केले. युझवेंद्र चहल आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आणि त्याने पर्पल कॅप जिंकली होती. चहलने आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात ४ विकेट घेत दमदार सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर ३०३ विकेट्सची नोंद झाली आहे.