Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL Match Updates : सलामीवीर फलंदाज केली मायर्सच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं लखनऊ सुपर जायंट्सने राजस्थानचा पराभव केला. बुधवारी जयपूरच्या मैदानात झालेल्या सामन्यात लखनऊने राजस्थानवर १० धावांनी विजय मिळवला. सुपरजायंट्सच्या १५५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचे सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल (३५ चेंडू ४४ धावा) आणि जॉस बटलर (४१ चेंडू ४० धावा) केल्यामुळं पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागिदारी झाली. परंतु, राजस्थानला या सामन्यात विजय मिळवण्यात सपशेल अपयश आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामना संपल्यानंतर के एल राहुलने एका घटेबद्दल प्रतिक्रिया दिली आणि कर्णधार म्हणून स्वत:ची चूक कबूल केली. सामन्यादरम्यान राहुलला त्याच्या साथीदार खेळाडूने फेकलेला चेंडू लागला होता. या घटनेची दखल घेत राहुलने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, “माझ्या साथीदाराचा थ्रो मला लागला, त्यावेळी मला समजलं की कर्णधार म्हणून मी काहीतरी चुकीचं करत आहे. आम्ही १६० च्या टार्गेटबद्दल विचार करत होतो पण असं झालं नाही. त्यांनी शानदार गोलंदाजी केली. आम्ही १० धावा कमी केल्या पण गोलंदाजांनी त्याची भरपाई केली.”

नक्की वाचा – RR vs LSG, IPL 2023: ‘जॉस’ द बॉसची ‘यशस्वी’ खेळी ठरली फोल, लखनऊचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

राहुलने माध्यमांशी बोलताना पुढे म्हटलं की, “या मैदानात दव नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी होत्या. आम्ही काल सामना खेळला आणि पाहिलं की, इथे १८० धावसंख्या पार होऊ शकते. परंतु बोल्टच्या पहिल्या षटकात मी आणि केली मायर्सने चर्चा केली. त्यावेळी आम्हाला समजलं ही १८० धावांची खेळपट्टी नाहीय. चेंडू थोडा खाली राहत होता. त्यामुळे आम्ही पॉवर प्ले मध्ये थोडा वेळ दिला. आम्ही अजून चांगलं प्रदर्शन केलं असतं, तर १७० धावा करू शकलो असतो.”