Kagiso Rabada Breaks lasith Malingas Record : आयपीएल २०२३ चा १८ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मोहालीच्या स्टेडियममध्ये रंगला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला पंजाब किंग्जने सामील केलं आणि गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यात रबाडाने एक विकेट घेत लीगच्या इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. रबाडा आता आयपीएलमधील सर्वात वेगवान १०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कगिसो रबाडाने त्याच्या दुसऱ्या षटकातील चौथ्याचेंडूवर गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज ऋद्धीमान साहाला ३० धावांवर बाद केलं आणि आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १०० विकेट्स घेण्याची कमाल केली. रबाडाने मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. रबाडाने फक्त ६४ सामन्यात १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तर मलिंगाला ही कामगिरी करण्यासाठी ७० सामने खेळावे लागले.

नक्की वाचा – IPL 2023, PBKS vs GT: भर मैदानात हार्दिक पांड्याने शिखर धवनला केलं किस, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रबाडा राष्ट्रीय टीमच्या प्रतिबद्धतेमुळं आयपीएल २०२३ चे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. गुरुवारी गुजरात टायटन्सविरोधात झालेला सामना रबाडासाठी या हंगामातील पहिला सामना होता. या २७ वर्षीय खेळाडूने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना २०२० मध्ये पर्पल कॅप जिंकली होती. त्याने या सीजनमध्ये १७ सामन्यात ३० विकेट्स घेतल्या होत्या. पंजाब किंग्जने आयपीएल २०२२ च्या लिलावर रबाडाला ९.२५ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.

आयपीएल २०२३ चा १८ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयईएस बिंद्रा स्टेडियममध्ये रंगला. गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या ६७ धावांच्या अर्धशतकी खेळीमुळं पंजबा किंग्ज विरोधात त्यांना विजय मिळवता आला. पंजाबने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातने सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला.