आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ताकदीत आता अजुन वाढ होणार आहे. कारण संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आणि यंदा मुंबईकडून खेळणारा शेर्फन रुदरफोर्ड हे युएईत दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – सलामीवीर की तिसरा क्रमांक, रोहित कोणत्या स्थानावर फलंदाजी करणार?? जाणून घ्या आकडेवारी काय सांगते..

कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळल्यानंतर पोलार्ड आणि रुदरफोर्ड हे दोन्ही खेळाडू आपल्या परिवारासोबत युएईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने या दोन महत्वाच्या खेळाडूंच्या आगमनाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

कायरन पोलार्ड यंदा फॉर्मात असणं मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर मानलं जातंय. कॅरेबिअन प्रमिअर लीग स्पर्धेत पोलार्डच्या त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने विजेतेपद मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा संघ या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. पोलार्डने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराचा किताब पटकावला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही पोलार्डने आपला फॉर्म कायम राखल्यास संघाला त्याचा फायदा होईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keiron pollard and other cpl bound players check in for respective franchises psd