इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन क्रिकेट जगतात चांगलाच प्रसिद्ध आहे. सध्या तो प्रत्यक्ष क्रिकेट खेळत नसला तरी त्याचे इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलशी खास नाते आहे. सध्या आयपीएल सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. असे असताना आता केविन पिटरसन पुन्हा एकदा भारतात येणार असून तो आयपीएलम सामन्यांत समालोचन करणार आहे. त्यासाठी त्याने हिंदी भाषेत खास ट्विट केले आहे. समालोचन करण्यासाठी मी उत्साही असून लवकरच भेटुयात असे केविन पिटरसनने म्हटले आहे.
हेही वाचा >>> IPL 2022 : दिल्ली कॅपिट्लसच्या ताफ्यात आणखी दोघांना करोनाची लागण, परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह
केविन पिटरसन हा इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू आहे. त्याचे आयपीएलशी जुने नाते आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझींसाठी खेळलेला आहे. त्यानंतर त्याने आयपीएलच्या अनेक हंगामात समालोचक म्हणून काम केलेले आहे. मात्र सध्या आयपीएल सुरु होऊ तीन आठवले झालेले असूनही त्याची कमी क्रिकेट रसिकांना जाणवत होती. मात्र ती प्रतीक्षा आता संपली असून केविन पिटरसन पुन्हा एकदा भारतात आयपीएल सामन्याचे समालोचन करण्यासाठी येणार आहे. तसे ट्विट त्याने केले आहे. खास हिंदी भाषेत ट्विट करत त्याने मी भारतीय आदरातिथ्य अनुभवण्यास उत्साही असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >>> IPL 2022 : “ताई, शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर…”; बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर हर्षल पटेल झाला भावूक
“आयपीएलमध्ये समालोचन करण्यासाठी मी भारतात परतत आहे. समालोचन करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. भारतीयांकडून जगातील सर्वात चांगले आदरातिथ्य केले जाते. भारतीयांनो काही तासांत भेटुया,” असे केविन पिटरसनने म्हटले आहे.
दरम्यान, केविन पिटरसन हा स्टार स्पोर्टकडून आयपीएलच्या सामन्यांसाठी समालोचन करतो. तो सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो आयपीएलसंदर्भात अपडेट्स देत असतो.