KKR beat LSG by 8 wickets to : आयपीएल २०२४ मधील २८वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि लखनऊ सुपरजायंट्स (एलएसजी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला गेला आहे. या सामन्यात कोलकाताने लखनऊवर ८ विकेट्सनी ऐतिहासिक विजय नोंदवला. कारण हा आयपीएल इतिहासातील केकेआरचा लखनऊविरुद्ध पहिला विजय आहे. याआधी झालेल्या तीन सामन्यात लखनऊने कोलकातावर विजय मिळवला होता. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने फिलिप साल्टच्या ८९ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर १५.४ षटकांत २ गडी गमावून सामना जिंकला.

फिलिप सॉल्टने शानदार फलंदाजी करत कोलकाताकडून नाबाद ८९ धावा केल्या. ४७ चेंडूंचा सामना करताना त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. श्रेयस अय्यरने नाबाद ३८ धावा केल्या. त्याने ६ चौकार मारले. यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्ससाठी मोहसीन खान हा यशस्वी गोलंदाज होता. या गोलंदाजाने ४ षटकात २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!

कोलकाता संघाला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र घरच्या मैदानावर विजय मिळवत संघाने पुनरागमन केले. कोलकाताने आतापर्यंत पाच सामन्यांत केवळ एकच सामना गमावला आहे, तर चार सामने जिंकले आहेत. केकेआर आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा संघ सहा सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार

तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकात ७ गडी गमावून १६१ धावा केल्या. वास्तविक, लखनऊ सुपर जायंट्सचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले, त्यामुळे हा संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला.

केकेआरसाठी मिचेल स्टार्क चमकला –

लखनऊ सुपर जायंट्ससाठी निकोलस पुरनने ३२ चेंडूत ४५ धावा केल्या. तर केएल राहुलने २७ चेंडूत ३९ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. या वेगवान गोलंदाजाने केएल राहुलच्या संघातील ३ फलंदाजांना आपला बाद केले. याशिवाय वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.