Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Highlights: कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊच्या घरच्या मैदानावर एलएसजी संघाचा ९८ धावांनी मोठा पराभव केला. केकेआरने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १५० धावाही करू शकला नाही. लखनऊची फलंदाजी बाजू फेल ठरल्याने संघ १३७ धावांवरच ऑल आऊट झाला. संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची खेळी मार्कस स्टॉयनिसने केली. त्याच्याव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. या विजयासह लखनऊ आयपीएल २०२४ च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

२३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात खराब झाली. ज्यात २० धावांवर त्यांनी पहिली विकेट अर्शिन कुलकर्णीच्या रूपाने गमवली, जो केवळ ९ धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने केएल राहुलसह झपाट्याने धावा करायला सुरू केली. दोघांनी मिळून पहिल्या ६ षटकात संघाची धावसंख्या ५५ धावांपर्यंत नेली. ७० धावांवर लखनऊला दुसरा धक्का कर्णधार राहुलच्या (२२)रूपाने बसला. यानंतर संघाने लागोपाठ विकेट गमावल्या.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Eknath khadse Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ

लखनऊने ६ बाद १०९ धावा केल्या. लखनौचा डाव १३७ धावांवर आटोपून केकेआरने केवळ ९८ धावांनी सामना जिंकला नाही तर प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले. केकेआरकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३ विकेट घेतले, आंद्रे रसेलने २ विकेट तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांनी १-१ विकेट घेण्यात यश मिळवले.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २३५ धावा केल्या. सलामीवीर सुनील नारायणच्या ८१ धावांच्या खेळीवर मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अवघ्या ३९ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय केकेआरसाठी अंगक्रिश रघुवंशीने ३२ धावा केल्या तर शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या रमणदीप सिंगने केवळ ६ चेंडूंचा सामना करत २५ धावांची नाबाद धारदार खेळी खेळून संघाची धावसंख्या २३५ पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लखनऊकडून गोलंदाजीत नवीन उल हकने ३ तर रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

Story img Loader