Nitish Rana praises Jason Roy and Suyash Sharma after win against RCB: नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने सलग चार पराभव आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध विजयाची चव चाखली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉय आणि नितीश राणा यांच्या धमाकेदार खेळीमुळे केकेआरने २० षटकांत ५ गडी गमावून २०० धावा केल्या. यानंतर उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीला २० षटकांत ८ बाद १७९ धावांवर रोखले आणि सामना २१ धावांच्या फरकाने जिंकला. या विजयानंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकजुटीच्या प्रयत्नातून विजय –

केकेआरचा आरसीबीविरुद्धच्या मोसमातील हा दुसरा विजय आहे. दोन्ही वेळा आरसीबीच्या फलंदाजांनी केकेआरच्या फिरकीसमोर नांगी टाकली आहे.सलग चार पराभवांनंतर केकेआरच्या विजयानंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणा म्हणाला की, “संघाच्या क्षमतेवर आपल्याला विश्वास होता, त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज होती. तो म्हणाला, मी गेल्या तीन-चार सामन्यांपासून नाणेफेकीच्या वेळी म्हणत होतो की, आम्ही तिन्ही विभागात एकत्रितपणे चांगली कामगिरी केली, तर निकाल नक्कीच आमच्या बाजूने येईल.”

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

जेसन रॉयच्या धडाकेबाज फलंदाजीचा फायदा झाला –

आरसबीविरुद्धच्या विजयात केकेआरचा फलंदाज जेसन रॉयने महत्वाची भूमिका बजावली. जेसन रॉयच्या फलंदाजीचे कौतुक करताना नितीश राणा म्हणाला, “नक्कीच फरक पडला आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये जेसन रॉय ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे आणि ड्रेसिंग रुममधील वातावरणात खूप फरक पडला आहे. ड्रेसिंग रूममध्ये अशी पात्रे असावीत, जी अशा परिस्थितीत असूनही अशी कामगिरी करतात. याचे श्रेय संपूर्ण टीमला जाते. आम्ही कधीही विश्वास गमावला नाही. मला खात्री होती की आम्ही पुनरागमन करू आणि आजचा दिवस आमच्यासाठी चांगला गेला.” स्वत:च्या फलंदाजीबाबत नितीश म्हणाला, ‘जोपर्यंत आम्ही जिंकत आहोत, तोपर्यंत माझी फलंदाजी चांगली आहे.’

केकेआर फिरकीपटूंवर विश्वास दाखवत आहेत-

विजयासाठी फिरकीपटूंवर विश्वास ठेवण्याबद्दल आणि त्यात यशस्वी होण्याबद्दल बोलताना केकेआरचा कर्णधार म्हणाला, “आज आमची योजना प्रथम मोठी धावसंख्या उभारण्याची आणि नंतर फिरकीपटूंना खेळात आणण्याचा प्रयत्न करण्याची होती. दुसऱ्या डावात दव पडणार नाही आणि चेंडू फिरेल, असे वाटत होते. पण खेळपट्टीकडून अपेक्षेइतकी फिरकीसाठी मदत झाली नाही.”

हेही वाचा – IPL 2023 RCB vs KKR: ‘आम्ही हरण्यास पात्र होतो…’, केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य

सुयश हा सकारात्मक दृष्टिकोन असलेला खेळाडू –

सुयश शर्माचे कौतुक करताना नितीश म्हणाला, ” मी जेव्हाही त्यांच्याशी बोललो आहे, तेव्हा तो नेहमीच सकारात्मक राहिला आहे. तो नेहमी म्हणतो की भैया द्या, मी करुन दाखवतो. तो आपला पहिला हंगाम आणि चौथा-पाचवा सामना खेळत आहे. आम्ही त्याला एवढेच सांगत आहोत की समोर कोण खेळत आहे, ते पाहू नको, फक्त तुझ्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित कर. जर तू योग्य ठिकाणी गोलंदाजी केली तर समोर जो असेल त्याला तुम्ही नक्कीच त्रास द्याल. प्रत्येक वेळी तो आमच्यासाठी ही गोष्ट करुन दाखवत आहे. त्यामुळे त्याच्याकडून आम्हाला आणखी काय हवे आहे.”

Story img Loader