IPL 2025 Kolkata Knight Riders Full Squad and Schedule: आयपीएलचा गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातही मोठे बदल झाले आहेत. कोलकाता संघाने आयपीएल ट्रॉफी विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज करत मोठा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सने अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरसाठी लिलावात तब्बल २३.७५ कोटी रुपयांची बोली लावली आणि संघात सहभागी केले, त्यामुळे संघ पाहता आणि त्याच्यावरील बोलीचा विचार करता वेंकटेश अय्यर संघाचा कर्णधार असेल, अशी चर्चा होती. पण केकेआरने मोठा निर्णय घेत संघाचे कर्णधारपद अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेकडे सोपवले.

लिलावात केकेआर संघाने श्रेयस अय्यरपेक्षाही वेंकटेश अय्यरला संघात घेण्यासाठी तिजोरी रिती केली. वेंकटेशव्यतिरिक्त कोलकाताने दक्षिण आफ्रिकेच्या अँनरिक नॉर्किया आणि क्विंटन डी कॉक या जोडगोळीला समाविष्ट केलं. अंगक्रिश रघुवंशी आणि रहमनुल्ला गुरबाझ यांची घरवापसी झाली. वैभव अरोरालाही कोलकाताने आपल्याकडेच वळवलं. मयांक मार्कंडेय हा गुणी फिरकीपटू आता कोलकाताकडून खेळताना दिसेल. तर अजिंक्य रहाणेला संघाने १.५० कोटींच्या मूळ किमतीसह केकेआरने संघात सामील केले. रहाणे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा त्याचे नाव पुकारण्यात आले तेव्हा केकेआरने रहाणेला आपल्या संघाचा भाग केले. यासह केकेआरला सर्वात कमी किमतीत संघासाठी एक चांगला कर्णधार मिळाला.

कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंगवर सर्वाधिक १३ कोटी रुपये खर्च करत त्याला रिटेन केले. याशिवाय फ्रँचायझीने वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी १२ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. फ्रँचायझीने हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते. याशिवाय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाने एक बदल केला आहे. उमरान मलिक दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे त्याच्या जागी केकेआरने चेतन सकारिया या भारतीय खेळाडूला संघात सामील केले आहे.

केकेआरने आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी रिटेन केलेले खेळाडू

रिंकू सिंग – १३ कोटी
वरूण चक्रवर्ती – १२ कोटी
सुनील नरेन – १२ कोटी
आंद्रे रसेल – १२ कोटी
हर्षित राणा – ४ कोटी
रमणदीप सिंग – ४ कोटी

कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Kolkata Knight Riders IPL 2025 Full Squad)

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Kolkata Knight Riders Match Schedule)

२२ मार्च – कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२६ मार्च – राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
३१ मार्च – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
३ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद
६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स
११ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
१५ एप्रिल – पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स
२६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स
२९ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
४ मे – कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स
७ मे – कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स
१० मे – सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स
१७ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स