आयपीएलच्या पंधऱाव्या हंगामात सर्वच सामने रोमहर्षक आणि अटीतटीचे होत आहे. या हंगामात असे काही खेळाडू समोर येत आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी त्यांना मोठी मेहनत करावी लागली आहे. सध्या केकेआरकडून खेळणारा रिंकू सिंह हादेखील यापैकीच एक आहे. हा खेळाडू अवघा आठवी पास असून कर्ज चुकवण्यासाठी त्याला चांगलंच झगडावं लागलेलं होतं.
हेही वाचा >> “१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण
केकेआरला यापूर्वी सलग पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यात हा संघ पुन्हा एकदा ट्रॅकवर आला असून केकेआरच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सामन्यात रिंकू सिंह चांगलाच चमकला. त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. त्याच्या याच खेळामुळे केकेआरला विजयापर्यंत पोहोचता आलं. रिंकू सिंह केकेआरचा नवा हिरो ठरतोय.
हेही वाचा >> KKR vs RR: सामन्यापूर्वीच रिंकू सिंगने तळहातावर लिहिला होता स्कोर; राणाला बसला धक्का, पाहा व्हिडिओ
नववी अणुत्तीर्ण आहे रिंकू सिंह
रिंकू सिंहने राजस्थानसोबतच्या सामन्यात ४२ धावा करत स्वत:ला सिद्ध केलंय. मात्र नावारुपाला येण्यापूर्वी त्याला मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. रिंकू सिंहला एकूण चार भाऊ-बहीण आहेत. त्याचे वडील गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचवण्याचं काम करायचे. तर त्याचा एक भाऊ ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करायचा. नवव्या वर्गात नापास झाल्यामुळे त्याच्यावर काम करण्याची वेळ आली होती. शिक्षण जास्त नसल्यामुळे त्याला चांगली नोकरीदेखील मिळत नव्हती. नोकरीच्या शोधात असताना त्याला एका ठिकाणी सफाई कामगार म्हणून नोकरी ऑफर करण्यात आली होती.
हेही वाचा >> IPL 2022 GT vs PBKS : आज पंजाब-गुजरात आमनेसामने, टायटन्सपुढे विजयी सातत्य राखण्याचे आव्हान
अशा कठीण काळात २०१५ साली त्याच्या कुटुंबीयांवर पाच लाख रुपयाचे कर्ज झाले होते. रिंकू सिंहने उत्तर प्रदेश अंडर १९ टीममध्ये खेळण्यासाठी मिळणारा भत्ता तसेच क्रिकेट खेळून मिळणाऱ्या पैशांतून या कर्जाची परतफेड केली. त्यानंतर २०१७ साली रिंकू सिंहला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याला २०१७ साली पंजाब किंग्जने दहा लाख रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र त्याला खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर २०१८ साली त्याला केकेआरने ८० लाख रुपयांना खरेदी केलं होतं. यावर्षी केकेआरनेच रिंकू सिंहला ५५ लाख रुपयांना खरेदी केलेलं आहे. संधी मिळताच त्याने आपली जादू दाखवत केकेआरला विजयापर्यंत घेऊन जाण्याची किमया केली.