कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी करु शकलेला नाही. सलामीला उतरुनही आतापर्यंतच्या तीनपैकी एकाही सामन्यात त्याला २० पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. असे असले तरी व्यंकटेश अय्यर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अय्यर आणि तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवळकर एकमेकांना डेट करत असल्याची सध्या सध्या चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IPL 2022 | तिकडे आईवर रुग्णालयात उपचार, इकडे विजयासाठी मुलाची झुंज, लखनऊच्या आवेश खानला सलाम !

अभिनेत्री प्रियंका जवळकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवरील एका फोटोवर क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने खास कमेंट केली आहे. प्रियंकाच्या फोटोवर व्यंकटेशने क्यूट अशी कमेंट केल्यावर प्रियंकानेदेखील “कोण तू ?” असे म्हणत लगेच रिप्लाय दिला आहे. या कमेंटनंतर सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. व्यंकटेश अय्यर आणि प्रियंका जवळकर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. असे असले तरी या चर्चेला कोणताही आधार नाही. दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेला अद्याप पुष्टी मिळालेली नाही.

हेही वाचा >> जेसन होल्डर, आवेश खानने हैदराबादला रोखलं, शेवटच्या षटकात सामना फिरल्यामुळे लखनऊचा विजय

दरम्यान, व्यंकटेश अय्यर सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असून आतापर्यंत त्याने कोणतीही खास कामगिरी केलेली नाही. कोलकाता संघाकडून व्यंकटेश फलंदाजीसाठी सलामीला उतरत आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये व्यंकटेशने १६, १० आणि ३ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr player venkatesh iyer commented on photo of actress priyanka jawalkar prd