Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL Latest Score Update: आयपीएल २०२३ चा ३९वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात खेळला जात आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर शनिवारी दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात जीटीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. जीटीचा स्टार फिरकीपटू राशिद खान आणि केकेआरचा कर्णधार नितीश राणा यांच्यासाठी हा सामना खूप खास आहे.
या दोघांनी मैदानात उतरताच विशेष शतके झळकावली. खरंतर, दोघेही आज आयपीएलचा १०० वा सामना खेळत आहेत. सामन्यांचे शतक पूर्ण केल्याबद्दल गुजरातच्या खेळाडूंनी राशिदचे अभिनंदन केले, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने ट्विटरवर शेअर केला आहे.
अफगाणिस्तानच्या राशिदने २७ मे २०१७ रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हा तो सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) विरुद्ध खेळला होता. त्याने ९९ आयपीएल सामन्यांमध्ये ६.५च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत १२६ विकेट घेतल्या आहेत. २४ धावांत ४ बळी ही त्याची या काळात सर्वोत्तम कामगिरी आहे. चालू मोसमात त्याने हॅटट्रिक घेतली आहे. तसेच २४ वर्षीय राशिद हा १०० आयपीएल सामने खेळणारा पहिला अफगाण क्रिकेटर आहे.
हेही वाचा – IPL 2023: अंबाती रायडूने त्याचे ट्विट सुनील गावसकरांच्या विधानाशी जोडल्याने व्यक्त केली नाराजी, म्हणाला…
राशिदप्रमाणे नितीशही आतापर्यंत आयपीएलमधील दोनच फ्रँचायझींचा भाग आहे. नितीश कोलकात्याच्या आधी मुंबई इंडियन्स (एमआय) मध्ये होता. त्याने २०१६ मध्ये मुंबईसाठी पहिला आयपीएल सामना आरसीबीविरुद्ध खेळला होता. राणाने या स्पर्धेत ९९ सामन्यांत २८.०९ च्या सरासरीने आणि १३५.७७ च्या स्ट्राईक रेटने २४१० धावा केल्या आहेत. त्याने १६ अर्धशतकं झळकावली आहेत. नितीश प्रथमच आयपीएलमद्ये संघाची कमान सांभाळत आहेत. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीमुळे नितीशला आयपीएल २०२३ मध्ये ही जबाबदारी देण्यात आली आहे