IPL 2025, LSG VS KKR Live Match Updates: ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर धावांची टांकसाळ अशा स्वरुपाच्या लढतीत लखनौने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला. लखनौने मिचेल मार्श, निकोलस पूरन यांच्या अर्धशतकांच्या बळावर २३८ धावांचा डोंगर उभारला. कोलकाताने अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांच्या भागीदारीच्या बळावर पाया रचला होता मात्र हे दोघं बाद झाले आणि कोलकाताची घसरगुंडी उडाली. रिंकू सिंगने विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण ते प्रयत्न चार धावांनी अपुरे ठरले.
IPL 2025, KKR vs LSG LIVE Highlights: आयपीएल २०२५ लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स लाईव्ह स्कोअर अपडेट्स
लखनौचा दमदार विजय
लखनौने अखेरच्या षटकात केकेआरवर 4 धावांनी विजय मिळवला. रवी बिश्नोईच्या अखेरच्या षटकात रिंकू सिंगने मोठे फटके मारले पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.
आंद्रे रसेल झेलबाद
शार्दुल ठाकूरने १७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आंद्रे रसेलला झेलबाद करत केकेआरच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं आहे.
कोलकाताची घसरगुंडी
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुस्थितीत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची एकदमच घसरगुंडी उडाली आहे. अजिंक्य रहाणेपाठोपाठ अंगक्रिश रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रमणदीप सिंग असे चौघे माघारी परतले आहेत.
शार्दूल ठाकूरचे ५ वाईड
२३८ धावांचा बचाव करताना लखनौची बाजू कमकुवत होताना दिसते आहे. १३व्या षटकात शार्दूल ठाकूरने तब्बल ५ वाईड टाकले. एकमेव रिव्ह्यू हातात असल्याने कर्णधार ऋषभ पंतने पंचांच्या वाईडच्या निर्णयाला आव्हान दिले नाही.
कर्णधार अजिंक्य रहाणेचं अर्धशतक
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत कर्णधार अजिंक्य रहाणेने दिमाखदार अर्धशतकी खेळी साकारली.
दिग्वेश राठीने सुनील नरिनला धाडलं तंबूत
पॉवरप्लेच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या सुनील नरिनला युवा दिग्वेश राठीने बाद केलं.
सुनील नरिन, क्विंटन डी कॉक आणि अजिंक्य रहाणे या त्रिकुटाच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने अवघ्या ६ षटकात ९० धावांची मजल मारली.
क्विंटन डी कॉक बाद
आकाश दीपने धोकादायक ठरू पाहणाऱ्या क्विंटन डी कॉकला बाद केलं.
मिचेल मार्श-निकोलस पूरनची जोरदार फटकेबाजी; लखनौ २३८
निकोलस पूरन (८७) आणि मिचेल मार्श (८१) यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने २३८ धावांची मजल मारली. पूरनने ७ चौकार आणि ८ षटकारांसह ही खेळी सजवली. मिचेल मार्शने ४८ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. एडन मारक्रमने २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.
निकोलस पूरनने रसेलच्या षटकात चोपल्या २४ धावा
डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने आंद्रे रसेलच्या षटकात २४ धावा कुटल्या.
हर्षित राणाने दूर केला मारक्रमचा अडसर
अतिशय सुरेख लयीत खेळणाऱ्या एडन मारक्रमचा अडसर हर्षित राणाने दूर केला. त्याने २८ चेंडूत ४७ धावा केल्या.
मार्श-मारक्रम जोडी सुसाट
मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली आहे. पॉवरप्लेच्या ६ षटकांचा या दोघांनी मजबूत फायदा उठवला.
मारक्रम-मार्शची सावध सुरुवात
तळपत्या उन्हात लखनौच्या एडन मारक्रम आणि मिचेल मार्श यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली आहे.
कोलकाता संघात मोईन अलीऐवजी स्पेन्सर जॉन्सन
कोलकाता नाईट रायडर्स संघ
क्विंटन डी कॉक, सुनील नरीन, अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेयर: मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, रोव्हमन पॉवेल, लुवनिथ सिसोदिया
लखनौ सुपरजायंट्स संघ
मिचेल मार्श, एडन मारक्रम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, आयुष बदोनी, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दूल ठाकूर, आकाश दीप, अवेश खान, दिग्वेश राठी
इम्पॅक्ट प्लेयर: रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाझ अहमद, मॅथ्यू ब्रीझटेक, हिंमत सिंग