IPL 2023, KKR vs PBKS Cricket Score Update: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी अडकले आहेत. येथे पराभूत झाल्यास दोन्ही संघांसाठी प्लेऑफचा मार्ग अत्यंत कठीण होईल. मात्र, कोलकात्याच्या तुलनेत पंजाबची स्थिती थोडी चांगली आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कोलकात्यासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्येक संघाला क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात हवी असते. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीला वेगवान धावा कराव्यात, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीला विकेट्स मिळवायच्या असतात. आयपीएल २०२३मध्ये मंगळवारी पंजाब किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. या सामन्यात पंजाबला चांगली सुरुवात करता आली नाही आणि याला कारण ठरला तो कोलकाताचा यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाज. गुरबाजने असा झेल पकडला की प्रेक्षक बघतच राहिले. फलंदाज प्रभसिमरन सिंगही काही काळ आश्चर्यचकित झाला.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान

गुरबाजने अफलातून झेल पकडला

दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रभासिमरन बाद झाला. हर्षित राणा हे षटक टाकत होता. प्रभसिमरन सिंगने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जो राणाच्या लेगस्टंपला लागला पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे गेला. लेगस्टंपवर चेंडू पाहून गुरबाजही लेगस्टंपच्या दिशेने जात होता, मात्र चेंडू बॅटच्या काठाने ऑफ स्टंपच्या बाहेर आल्यावर गुरबाजने उडी मारून तो पकडण्याचा प्रयत्न केला. गुरबाजला मात्र पहिल्याच प्रयत्नात चेंडू पकडता आला नाही आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजला स्पर्श करून बाहेर गेला. पण गुरबाजने थोड्या अंतरावर धाव घेतली, नंतर डायव्ह करून चेंडू पकडला. यासह प्रभसिमरन सिंग बाद झाला. त्याने आठ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने १२ धावा केल्या.

गुरबाजने जितेशचाही झेल पकडला

गुरबाजने पुन्हा आणखी एक चांगला झेल पकडला. १३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने पंजाबचा झंझावाती फलंदाज जितेश शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, मात्र गुरबाजचे उत्कृष्ट यष्टिरक्षण याला कारणीभूत ठरले. जितेशने वरुणच्या ऑफ स्टंपच्या ओळीत चेंडू कापण्याचा प्रयत्न केला पण चेंडूने त्याच्या बॅटची बाहेरची कड घेतली आणि गुरबाजने धारदार झेल घेतला. जितेशने १८ चेंडूत २१ धावा केल्या. या खेळीत त्याने दोन षटकार मारले.

कोलकातासमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याचवेळी, शेवटी शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. फिरकी गोलंदाजांनी कोलकात्यासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. हर्षित राणाला दोन बळी मिळाले. सुयश शर्मा आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.