IPL 2025 KKR vs PBKS Highlights: आयपीएल २०२५ मधील कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात वादळी वारा आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने विश्रांती न घेतल्याने अखेरीस सामना रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला आहे. यामुळे पंजाबचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे, तर केकेआर सातव्या स्थानी राहिला आहे. हा सामना रद्द झाल्याने प्लेऑफ गाठण्याच्या केकेआरच्या आशांना धक्का बसला आहे.

पंजाबने प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्या १२० धावांच्या भागीदारीच्या जोरावर २०१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात केकेआरने पहिल्या षटकात ७ धावा करत सामन्याला चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर दुसरे षटक सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली आणि सामना थांबवण्यात आला. काही वेळाने पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना रद्द करण्यात आला.

Live Updates

IPL 2025 Kolkata Knight Riders vs Punjab Kings Highlights: आयपीएल २०२५ कोलकाता नाईट राडर्स वि. पंजाब किंग्स सामन्याचे हायलाईट्स

23:05 (IST) 26 Apr 2025
KKR vs PBKS LIVE: पंजाब-केकेआर सामना रद्द

आयपीएल २०२५ मधील पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. कोलकातामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हा निर्णय घेण्यात आला. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाता संघाला सर्व सामने जिंकणं महत्त्वाचं होतं. पण १ गुण मिळाल्याने संघासाठी हा धक्का असणार आहे. तर पंजाबसाठी १ गुणही सोयीचा ठरला.

https://twitter.com/IPL/status/1916187229480784218

22:41 (IST) 26 Apr 2025
KKR vs PBKS LIVE: ५ षटकांचा सामना होण्यासाठीची कट ऑफ वेळ

केकेआर वि. पंजाब किंग्स सामना सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावली आहे. विश्रांती घेतल्यानंतर पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे. टी-२० सामन्याचा निकाल लागण्यासाठी कमीत कमी ५ षटकांचा सामना होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ५ षटकांचा सामना सुरू होण्यासाठी कट ऑफ वेळ ११.४४ आहे. ५ षटकांचा सामना झाल्यास ६१ धावांचं लक्ष्य केकेआरला देण्यात येईल.

22:39 (IST) 26 Apr 2025
KKR vs PBKS LIVE: पुन्हा पावसाला सुरूवात

ईडन गार्डन्सवर पावसाने काही वेळापूर्वी विश्रांती घेतली होती. पण आता पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सामन्याची षटकं कमी व्हायला देखील सुरूवात झाली आहे. अद्याप षटकं कमी होण्याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही.

22:09 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: षटकं कमी व्हायला सुरूवात होण्याची कट ऑफ वेळ

ईडन गार्डन्सवर सुरू असलेला पंजाब किंग्स वि. केकेआर सामना पावसामुळे थांबला आहे. वादळी पाऊस असल्याने मैदान कव्हर करण्यातही ग्राऊंड स्टाफला मोठा अडथळा येत आहे. पण पाऊस जर १०.३५ पर्यंत थांबून पुन्हा सुरू झाला नाही तर सामन्याची षटकं कमी व्हायला सुरूवात होईल.

21:36 (IST) 26 Apr 2025
KKR vs PBKS LIVE: पंजाब-केकेआर सामना थांबवला

ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेला पंजाब-केकेआर सामना थांबवण्यात आला आहे. पंजाबने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी केकेआरची जोडी उतरली. पहिल्या षटकात ७ धावा केल्यानंतर अचानक सामना थांबवला. कोलकातामध्ये अचानक जोरदार वारा सुटला आणि सामना थांबवला. इतक्या जोरात वादळ आलं की काही मिनिटातच पावसाच्या सरी बरसल्या आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले. वादळ इतकं जोरात होतं की ग्राऊंडस्टाफला मैदानावर कव्हर्स टाकण्याकरता फार कष्ट घ्यावे लागले.

https://twitter.com/CricSubhayan/status/1916162379626275192

21:15 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: केकेआरसमोर इतक्या धावांचं लक्ष्य

प्रियांश आर्य आणि प्रभसिमरच्या १२० धावांच्या भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्सने २०१ धावांचा डोंगर उभारला. पण पंजाब किंग्सने आपल्या फलंदाजी ऑर्डरने मोठ्या धावसंख्येला स्वत:चं आळा घातला. नेहाल वढेरा-शशांक सिंग या दोघांना फलंदाजी न देता मार्काे यान्सन, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांना फलंदाजीला पाठवलं. केकेआरने अखेरच्या षटकांमध्ये चांगलं पुनरागमन करत अधिक धावा करण्यापासून रोखलं.

21:10 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: मार्काे यान्सन झेलबाद

१९ व्या षटकात वैभव अरोराने मोठा फटका खेळण्यासाठी गेलेल्या मार्काे यान्सनला झेलबाद केलं. यान्सन ७ चेंडूत ३ धावा करत बाद झाला. पंजाब किंग्सच्या फलंदाजी क्रमावर सध्या प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. नेहाल वढेरा आणि शशांक सिंगसारखे उत्कृष्ट फलंदाज डगआऊटमध्ये असताना पंजाबने प्रथम मार्काे यान्सन, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांना फलंदाजीला पाठवले.

21:03 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: ग्लेन मॅक्सवेल क्लीन बोल्ड

वरूण चक्रवर्तीच्या स्पेलमधील अखेरच्या षटकात त्याने ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं आहे. वरूणने पाचव्यांदा मॅक्सवेलला बाद केलं आहे. यासह पंजाबने १७ षटकांत ३ बाद १७४ धावा केल्या आहेत.

20:47 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: प्रभसिमरन सिंग झेलबाद

प्रभसिमरन सिंगने वरूण चक्रवर्तीच्या १४व्या षटकात ३ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा केल्या. तर पुढच्याच षटकात वैभव अरोराने त्याला झेलबाद केलं. प्रभसिमरन सिंगने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली आणि संघाच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

20:36 (IST) 26 Apr 2025
KKR vs PBKS LIVE: प्रभसिमरनचं अर्धशतक

प्रभसिमरन सिंगने शानदार फलंदाजी करत १३व्या षटकांत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. प्रभसिमरन सिंगने ३८ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. तर साकारियाच्या १३ व्या षटकात १८ धावा करत संघाची धावसंख्या १३९ धावांवर नेली आहे.

20:35 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: प्रियांश आर्य झेलबाद

डावातील १२व्या षटकात आंद्रे रसेलने पाचव्या चेंडूवर प्रियांश आर्यला झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. प्रियांश आर्य ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावा करत बाद झाला. यासह पंजाबने १२ षटकांत १ बाद १२१ धावा केल्या आहेत.

20:22 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: प्रियांश आर्यचं अर्धशतक

पंजाब किंग्सचा शतकवीर प्रियांश आर्यने केकेआरविरूद्ध उत्कृष्ट अर्धशतक झळकावले आहे. प्रियांश आर्यने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा पूर्ण केल्या आहेत. यासह १० षटकांत पंजाबने एकही विकेट न गमावता ९० धावा केल्या आहेत. तर केकेआरचा संघ पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.

20:21 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: प्रियांश आर्यचं अर्धशतक

पंजाब किंग्सचा शतकवीर प्रियांश आर्यने केकेआरविरूद्ध उत्कृष्ट अर्धशतक झळकावले आहे. प्रियांश आर्यने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा पूर्ण केल्या आहेत. यासह १० षटकांत पंजाबने एकही विकेट न गमावता ९० धावा केल्या आहेत. तर केकेआरचा संघ पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.

20:03 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: पॉवरप्ले

पंजाब किंग्सचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी ६ षटकांत एकही विकेट न गमावता ५६ धावा केल्या आहेत. प्रभसिमरनने २५ धावा तर प्रियांश २९ धावा करत खेळत आहे. तर केकेआरला पहिल्या विकेटची प्रतिक्षा आहे.

19:50 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: सामन्याला सुरूवात

पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरूवात झाली आहे. पंजाबकडून युवा सलामी जोडी मैदानात उतरली आहे. या दोघांनी ३ षटकांत बिनबाद २५ धावा केल्या आहेत.

19:12 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: पंजाबची प्लेईंग इलेव्हन

पंजाब किंग्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये देखील दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. पंजाब किंग्सच्या संघात ग्लेन मॅक्सवेल परतला आहे. तर अझमतुल्ला ओमरझाई देखील खेळताना दिसणार आहे.

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

19:10 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: केकेआरची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रोव्हमन पॉवेलला केकेआरकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर चेतन साकारिया खेळताना दिसणार आहे.

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

19:04 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: नाणेफेक

कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स सामन्याची नाणेफेक पंजाबने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर केकेआरचा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. पंजाब किंग्सच्या ताफ्यात दोन मोठे बदल झाले आहेत.

18:32 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग,

18:31 (IST) 26 Apr 2025

KKR vs PBKS LIVE: केकेआरचा संपूर्ण संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया

IPL 2025 KKR vs PBKS Highlights: आयपीएल २०२५ मधील केकेआर वि. पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.