IPL 2025 KKR vs RCB Match Updates in Marathi: आयपीएल २०२५ चा सलामीचा सामना गतविजेते केकेआर वि. आरसीबी यांच्यात खेळवला जात आहे. पहिला सामना केकेआरच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासह आरसीबीने सुरूवात चांगली केली. पण केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वादळी फलंदाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.
आरसीबीने गोलंदाजीचा निर्णय घेत चांगली सुरूवात केली. आरसीबीकडून हेझलवूडने पहिल्याच षटकात विकेट घेत चांगली सुरूवात केली. यासह पहिल्या २ षटकांत केकेआरने ५ धावा केल्या होत्या. पण आरसीबी हा दबाव कायम ठेवू शकली नाही. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने वादळी फलंदाजी करत २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय सुनील नरेनबरोबर शतकी भागीदारी रचली.
रहाणेने प्रत्येक षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला तर नरेनने देखील त्याला चांगली साथ देत आरसीबीची पहिल्याच सामन्यात धुलाई केली. अजिंक्य रहाणेने संघाला १० षटकांच्या आत १०० धावांचा टप्पा गाठून दिला. रहाणेने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. तर सुनील नरेनने २६ चेंडूत चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावा केल्या.
First match as #KKR captain ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
First fifty of the season ✅
Ajinkya Rahane continues to make merry ?
Updates ▶ https://t.co/C9xIFpQDTn#TATAIPL | #KKRvRCB | @KKRiders pic.twitter.com/aeJUNEF9Bs
अजिंक्य रहाणेची विकेट गमावल्यानंतर केकेआरचा संघ कोसळला. २३.७५ कोटींचा वेंकटेश अय्यर ६ धावा करत क्लीन बोल्ड झाला. तर रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलही फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाले. आरसीबीच्या फिरकीपटूंनी क्रुणाल पंड्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ विकेट घेतले.
आयपीएल २०२५ चा सलामीचा सामना सुरू होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनी पार पडली. या सेरेमनीमध्ये काही परफॉर्मन्स पाहायला मिळाले. आयपीएल २०२५ ची ओपनिंग सेरेमनी ईडन गार्डन्सवर पार पडली. ईडन गार्डन्स हे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं होम ग्राऊंड आहे. या ओपनिंग सेरेमनीची सुरूवात शाहरूख खानने केली. शाहरूख खान हा केकेआर संघाचा सहमालक आहे. शाहरूख खानच्या भाषणानंतर कार्यक्रम सुरू झाले. यामध्ये गायिका श्रेया घोषाल, बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि रॅपर-गायक करन औलुजा यांनी वेगवेगळे परफॉर्मन्स सादर केले.