KKR vs RCB, Nitish Rana Statement: आयपीएलचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फॅफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण नाणेफेकीच्या वेळी अशी घटना घडली जी क्रिकेटमध्ये क्वचितच घडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, नाणेफेकीच्या वेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणे फेकले आणि फॅफने हेड कॉल केला, पण मॅच रेफरीला असे वाटले की फॅफने टेल कॉल केला आहे. हे सर्व झाल्यावर नाणेफेकीचे आयोजन करणाऱ्या संजय मांजरेकर यांना सांगितले की, “नितीश राणाने नाणेफेक जिंकली आहे.” त्यानंतर फॅफने मॅच रेफ्रींना हेड बोलल्याचं सांगितलं, म्हणजेच आरसीबीला नाणेफेक विजेता घोषित करण्यात आले. यादरम्यान केकेआरचा कर्णधार नितीश राणाच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली की मॅच रेफरीने त्याला टॉसचा विजेता घोषित केला होता पण तो निर्णय बदलण्यात आला.

नाणेफेकीदरम्यान नितीश राणाने व्यक्त केली नाराजी

मात्र, संजय मांजरेकर यांनी नितीश राणाला या निर्णयावर आनंदी आहेस का?, असा प्रश्न विचारला असता, नितीश राणा याने आक्षेप घेतला नाही. पण त्याने आपली नाराजी व्यक्त केली होती. अशाप्रकारे या सामन्यात आरसीबीने नाणेफेक मजेदार पद्धतीने जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीने सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत केकेआरचे ३ फलंदाज अवघ्या ४७ धावांत बाद केले.

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेत विजयी सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या झटपट विकेट्स काढण्यात बेंगलोरला यश आले होते. मात्र, कोलकाताच्या शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंग यांनी बेंगलोरच्या गोलंदाजांचा घाम काढत संघाची धावसंख्या दोनशेपार करण्यात मोलाचे योगदान दिले. फलंदाजांव्यतिरिक्त कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बंगळुरूला ८१ धावांनी पराभूत केले. हा कोलकाताचा स्पर्धेतील पहिला विजय ठरला.

हेही वाचा: IPL 2023: वाढता वाढता वाढे…, उशिरापर्यंत चालणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळेवर BCCI वेसन घालणार?

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत २०४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरू संघाला १७.४ षटकात १० विकेट्स गमावत १२३ धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकाताने हा सामना ८१ धावांनी खिशात घातला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr vs rcb ipl 2023 nitish rana won the toss but faf du plessis took the decision see what is the whole matter avw