Dinesh Karthik’s 250th match in IPL : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३६ वा सामना कोलकाता नाईट रायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळला जात आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात आरसीबीचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकने एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. दिनेश कार्तिकने असा पराक्रम केला आहे, जो याआधी फक्त दोनच खेळाडू करू शकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३८ वर्षीय कार्तिकने रचला इतिहास –

दिनेश कार्तिक हा आयपीएलमधील सर्वात जुन्या खेळाडूंपैकी एक आहे. तो २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. कोलकाता नाईट रायझर्स विरुद्ध खेळला जाणारा सामना हा दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीतील २५० वा सामना आहे. दिनेश कार्तिक व्यतिरिक्त, रोहित शर्मा आणि एमएस धोनी हे आयपीएलमधील दोनच खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये २५० सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २५६ सामने खेळले आहेत.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेले टॉप-५ खेळाडू –

एमएस धोनी – २५६ सामने
रोहित शर्मा – २५० सामने
दिनेश कार्तिक – २५० सामने
विराट कोहली – २४५ सामने
रवींद्र जडेजा – २३२ सामने

हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द –

दिनेश कार्तिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये २६.६४ च्या सरासरीने ४७४२ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १३४.९८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २२ अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर या मोसमात त्याने ७५.३३ च्या सरासरीने २२६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे आणि या हंगामात त्याने २०५.४५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

हेही वाचा – KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr vs rcb match dinesh karthik is the third player after ms dhoni and rohit sharma to play most 250 matches in ipl vbm