IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Match Updates: आयपीएलच्या ५६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सामना सुरु आहे. युजवेंद्र चहलच्या जादुई फिरकी गोलंदाजीपुढे कोलकाताचे फलंदाज निष्प्रभ ठरले. इंडियन प्रीमिअर लीगमधील ५६व्या सामन्यात राजस्थानला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात प्रथमच कोलकाता आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. दोघांचे ११-११ सामने झाले असून १०-१० गुण आहेत. राजस्थान पाचव्या तर कोलकाता सहाव्या स्थानावर आहे.

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावांवर रोखले. राजस्थानला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य मिळाले होते. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले. संदीप शर्मा आणि के.एम. आसिफ यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्यांच्याशिवाय कर्णधार नितीश राणाने २२, रहमानउल्ला गुरबाजने १८, रिंकू सिंगने १६, आंद्रे रसेल आणि जेसन रॉयने प्रत्येकी १०-१० धावा केल्या. सुनील नारायणने ६ धावा केल्या. शार्दुल ठाकूर केवळ एक धाव करून बाद झाला. अनुकुल रॉयने एक षटकार ठोकला तो ६ धावांवर नाबाद राहिला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

राजस्थान रॉयल्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघ प्रथम फलंदाजी करेल. ट्रेंट बोल्ट आणि केएम आसिफ राजस्थान संघात परतले आहेत. कुलदीप यादव आणि मुरुगन अश्विन यांना वगळण्यात आले आहे. जे मूळ संघात राहतात. दुसरीकडे, वैभव अरोराच्या जागी अनुकुल रॉयचा कोलकाता संघात समावेश करण्यात आला.

हेही वाचा: ODI World Cup: आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही!  विश्वचषक २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानचा भारतात येण्यास नकार

सलग दोन विजय नोंदवल्यानंतर कोलकाता संघ येथे पोहोचला असून त्याचा उत्साह उंचावला आहे. दुसरीकडे, राजस्थानने गेल्या ६ पैकी ५ सामन्यात पराभव पत्करला असून संघाला आणखी एक पराभव परवडणारा नाही. या सामन्यात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे, जे गोलंदाजी आक्रमण मजबूत करेल, तर अॅडम झम्पा आणि जो रूट यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल, हे खेळपट्टीच्या मूडवर अवलंबून असेल.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, के.एम. आसिफ, युजवेंद्र चहल.

Story img Loader