Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Score Updates: आयपीएलच्या १९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शुक्रवारी (१४ एप्रिल) पार पडला. या सामन्यात फलंदाजाचा बोलबाला जास्त होता. हैदराबादकडून सलामीवीर हॅरी ब्रुकने आयपीएल२०२३ हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने कोलकातासमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना रिंकू सिंग, नितीश राणा यांनी धुव्वाधार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. मात्र सामना २३ धावांनी गमावला.

धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. रहमानउल्ला गुरबाजला भोपळाही फोडता आला नाही डावाच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचा सनरायझर्स हैदराबादने २३ धावांनी पराभव केला. कोलकाताला शेवटच्या षटकात ३२ धावांची गरज होती. रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर क्रीजवर होते. रिंकूने गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात २९ धावांचा पाठलाग केला होता, मात्र यावेळी चमत्कार घडला नाही. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादव बाद झाला. त्यानंतर केवळ आठ धावा झाल्या. रिंकूने षटकार मारला पण तो पुरेसा नव्हता.

Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्सने २० षटकांत ४ बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ७ गडी गमावून २०५ धावाच करता आल्या. रिंकू सिंगने ३१ चेंडूत ५८ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार नितीश राणाने ४१ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. एन जगदीशनने २१ चेंडूत ३६ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने १२ आणि व्यंकटेश अय्यरने १० धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेल तीन धावा करून बाद झाला तर उमेश यादव एक धाव करून नाबाद राहिला. रहमानउल्ला गुरबाज आणि सुनील नरेन यांना खातेही उघडता आले नाही.

हेही वाचा: Rishabh Pant: अब दिल्ली दूर नही! हातात वॉकर तरीही संघाचे मनोबल वाढवण्यासाठी ऋषभ पंत उतरला मैदानात!

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात केली . मयंक केवळ ९ धावा करून बाद झाला. पण हॅरी ब्रूक वेगाने धावा करताना दिसला, त्याने या आयपीएल हंगामातील पहिले शतक ठोकले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा साथीदार राहुल त्रिपाठी ९ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार एडन मार्करामने हॅरी ब्रूकसह तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. एडन मार्कराम ५० धावा करून बाद झाला. ब्रूक आणि अभिषेकने ३३ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली. अभिषेक १७ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. याविजयासह हैदराबादचे गुणतालिकेत ४ गुण झाले आहेत.