IPL 2025, SRH VS KKR Highlights: आयपीएल २०२५ मध्येही हैदराबाद संघाला कोलकाताने त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का दिला. केकेआरने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वादळी फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हैदराबाद संघ १५० धावाही करू शकला नाही आणि अवघ्या १२० धावांवर सर्वबाद झाला. संघाच्या कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि केकेआरच्या गोलंदाजांनी वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादचा हा आयपीएल २०२५ मधील सलग तिसरा पराभव आहे. या पराभवासह हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत अखेरच्या स्थानी पोहोचला आहे.
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Highlights: कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे हायलाईट्स
KKR vs SRH Live: हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक
KKR vs SRH Live: २ षटकांत २ विकेट
वरूणच्या १६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कमिन्स झेलबाद झाला. तर दुसऱ्या चेंडूवर सिमरजीत सिंग गोल्डन डकवर क्लीन बोल्ड केलं.
KKR vs SRH Live: अनिकेत वर्मा झेलबाद
सनरायझर्स हैदराबादचा नवा फलंदाज अनिकेत वर्मा जो फिरकीविरूद्ध वादळी फलंदाजी करतो, तो देखील वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. वरूणच्या ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला, पण चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागल्याने सीमारेषेजवळ तो झेलबाद झाला.
KKR vs SRH Live: हैदराबादचा निम्मा संघ माघारी
आंद्रे रसेलने सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर नितीश रेड्डीला झेलबाद केले. नितीश रेड्डीला काही कळण्याआधीच त्याने फटका लगावला होता आणि फिल्डरच्या हातात सोपा झेल देत झेलबाद झाला. यानंतर नरेनच्या १०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कामिंदू मेंडिस चांगली फलंदाजी करत असतानाच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह १० षटकांत हैदराबादने ६ बाद ७२ धावा केल्या आहेत.
KKR vs SRH Live: दोन षटकात दोन विकेट
हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अभिषेक शर्मा झेलबाद झाला. तर वैभव अरोराच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर इशान किशन झेलबाद झाला. अजिंक्य राहणेने एक कमालीचा झेल टिपत सर्वांनाच चकित केलं. यासह हैदराबाने ३ षटकांत ९ बाद ३ विकेट्स गमावले आहेत.
केकेआरचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या वैभव अरोराने पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. तर दुसऱ्याच चेंडूवर तो मोठा फटका खेळायला गेला पण चेंडू हवेत उंच उडाला आणि हर्षित राणाने एक कमालीचा झेल टिपत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यरच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर धावांचा मोठा डोंगर उभारला. रिंकू सिंग आणि वेंकटेश अय्यर यांनी ४० चेंडूत ९१ धावांची भागीदारी रचत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. अंगक्रिश रघुवंशीने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. तर वेंकटेश अय्यरने झंझावाती खेळी करत २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेेने ३८ धावा, तर रिंकू सिंगने ३२ धावांची खेळी केली. यासह केकेआरने हैदराबादला विजयासाठी २०१ धावांच लक्ष्य दिलं आहे.
केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू वेंकटेश अय्यरने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेंकटेश अय्यरने पॅट कमिन्सच्या १९व्या षटकात २१ धावा कुटत संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. वेंकटेशने १९व्या षटकात ३ चौकार आणि १ षटकार लगावत कमिन्सची धुलाई केली. अखेरच्या षटकात त्याने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर १ चौकार आणि १ षटकार लगावला, पण तो तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. अय्यरने २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. वेंकटेश अय्यरने रिंकू सिंगबरोबर ४० चेंडूत ९१ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली.
KKR vs SRH Live: रिंकू सिंगची चौकारांची हॅटट्रिक
रिंकू सिंगने हर्षल पटेलच्या १७व्या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या चेंडूवर चौकार लगालत चौकारांची हॅटट्रिक केली आहे. यासह केकेआरने १७ षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या आहेत.
KKR vs SRH Live: अंगक्रिश रघुवंशीचं अर्धशतक आणि झेलबाद
अंगक्रिश रघुवंशीने ३१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने १२ षटकांत १०६ धावांचा टप्पा गाठला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रघुवंशी कामिंदु मेंडिसच्या षटकात झेलबाद झाला.
KKR vs SRH Live: अजिंक्य रहाणे बाद
झीशान अन्सारीच्या ११व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रहाणेला झेलबाद केलं. रहाणे चांगली फटकेबाजी करत होता. पण अखेरीस गेल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या झीशान अन्सारीने संघाला मोठी विकेट मिळवून दिली. रहाणेने २७ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावा केल्या होत्या.
KKR vs SRH Live:१० षटकांत किती धावा?
केकेआरने अजिंक्य रहाणेच्या ३८ धावा आणि अंगक्रिश रघुवंशीच्या ३० धावांच्या जोरावर २ बाद ८४ धावा केल्या आहेत. गेल्या काही षटकांमध्ये फार धावा मिळाल्या नसल्या तरी रहाणेने कमिन्सच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत दबाव कमी केला.
केकेआरने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५३ धावा केल्या. रहाणे आणि रघुवंशीने सुरूवातीच्या विकेट्सनंतर संघाचा डाव सावरला.
कमिन्स आणि शमीच्या जोडीने हैदराबादला पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स मिळवून दिले आहेत. कमिन्सच्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्विंटन डिकॉक झेलबाद झाला. तर तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नरेन झेलबाद झाला. यासह सुरूवातीच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा केकेआरचे सलामीवीर फेल झाले. यासह ३ षटकांत केकेआरने २ बाद १७ धावा केल्या आहेत.
KKR vs SRH Live: सामन्याला सुरूवात
सनरायझर्स हैदराबाद वि. केकेआर सामन्याला सुरूवात झाली आहे. क्विंटन डिकॉक आणि सुनील नरेनची जोडी मैदानावर फलंदाजीला उतरली आहे. तर मोहम्मद शमीने गोलंदाजीला सुरूवात केली. संघाने पहिल्या षटकात ७ धावा केल्या आहेत.
KKR vs SRH Live: कोण आहे हैदराबादचा फिरकीपटू झीशान अन्सारी?
KKR vs SRH Live: हैदराबादचा फिरकीपटू झीशान अन्सारी कोण आहे?
<a href="http://https://www.loksatta.com/krida/ipl/who-is-zeeshan-ansari-picked-three-wickets-on-ipl-debut-during-srh-vs-dc-ipl-2025-former-india-u19-wc-spinner-bdg-99-4986669/:~:text=%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%9A%E0%A4%BE,%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8%20%E0%A4%A4%E0%A5%8B%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE.">IPL 2025: कोण आहे झीशान अन्सारी? SRH कडून पदार्पणात घेतले ३ विकेट; राहुलला केलं क्लीन बोल्ड; ऋषभ पंतशी आहे कनेक्शन
अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), कामिंडू मेंडिस, सिमरजीत सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग
कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याची नाणेफेक हैदराबादच्या संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केकेआरच्या ताफ्यात एक बदल करण्यात आला असून संघ तीन फिरकीपटूंसह या सामन्यात उतरणार आहे. स्पेन्सर जॉन्सनच्या जागी मोईन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर हैदराबादकडून कामिंदू मेंडिसने आयपीएल पदार्पण केले आहे.
KKR vs SRH Head To Head: केकेआर वि. एसआरएच हेड टू हेड
हैदराबादविरुद्ध केकेआरचा आयपीएलमधील रेकॉर्ड आतापर्यंत खूप कमाल राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये केकेआरने १९ सामने जिंकले आहेत तर हैदराबादने ९ सामने जिंकले आहेत. २०२० पासून गेल्या ११ सामन्यांमध्ये KKR ने ९वेळा विजय मिळवला आहे.
KKR vs SRH Live: केकेआरची कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये ३ पैकी एकच सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वखालील केकेआरला पहिल्याच सामन्यात आरसीबीने पराभवाचा दणका दिला. तर दुसऱ्या सामन्यात केकेआरने राजस्थानचा पराभव करत पहिला विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने केकेआरचा लाजिरवाणा पराभव केला.
KKR vs SRH Live: सनरायझर्स हैदराबादची कामगिरी
वादळी फटकेबाजी करत गोलंदाजांवर दडपण आणणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने पहिल्याच सामन्यात राजस्थानविरूद्ध आयपीएलमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. पण यानंतर संघाला लखनौ सुपर जायंट्स संघाने पराभवाचा दणका दिला. यानंतर दिल्लीच्या संघानेही हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येला आळा घालत त्यांचा पराभव केला आहे.
KKR vs SRH Live:कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नॉर्किया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया
KKR vs SRH Live: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), विआन मुल्डर, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, ॲडम झाम्पा, सचिन बेबी, इशान मलिंगा, समिरजीत सिंग, जयदेव उनाडकट, कामिंदु मेंडिस, राहुल चहर, अथर्व तायडे