आयपीएलचे पंधरावे पर्व सध्या शेवटच्या टप्यात आहे. प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी संघामध्ये चुरस लागली आहे. आजदेखील सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याचा आशा खूपच कमी असल्या तरी हा संघ आज विजय संपादन करुन हैदरबादला अडचणीत आणू शकतो.

हेही वाचा >> आधी निवृत्त झाल्याचे केले जाहीर, नंतर घेतली माघार? अंबाती रायडूच्या ट्विटमुळे संभ्रम

केन विल्यम्सन नेतृत्व करत असलेला हैदरबाद आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सायंकाळी ७.३० वाजता लढत होणार आहे. केकेआर हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. त्यामुळे या संघाची सध्या बिकट परिस्थिती आहे. केकेआराने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी तो फक्त १४ गुण मिळवू शकेल. याच कारणामुळे कोलकाता संघाची प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघदेखील आठव्या स्थानी असून उर्वरित तिन्ही सामने जिंकून हा संघ १६ गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. १६ गुण मिळवून अन्य संघांची स्थिती अनुकूल राहिली तर हा संघ प्लेऑफर्यंत पोहोचू शकतो.

हेही वाचा >> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

हैदराबाद संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. या संघातील अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मर्कराम या फलंदाजांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. तर सध्या केन विल्यम्सनदेखील फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळे संघाची चिंता वाढलेली आहे. गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमार चांगली कामगिरी करत असून त्याला उमरान मलिकची साथ आहे. त्यामुळे हा संघ केकेआरशी पूर्ण ताकतीने संघर्ष करताना दिसेल.

हेही वाचा >> जॉनी बेअरस्टोपुढे बंगळुरुच्या गोलंदाजांनी टेकले हात, अवघ्या २१ चेंडूमध्ये झळकावले अर्धशतक

तर दुसरीकडे कोलकाताने आतापर्यंत फक्त पाच सामने जिंकले असून संघ फलंदाजी विभागात श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, अजिंक्य रहाणे यांच्यावर अवलंबून असेल. आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी हा संघदेखील पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

सनरायझर्स हैदराबाद संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, केन विल्यम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, कार्तिक त्यागी

आजचा सामना कोठे पाहता येईल

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी या चॅनेल्सवर तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल.

Story img Loader