CSK vs LSG IPL 2024: केएल राहुलला आपण कायमच मैदानात शांत पाहिलं आहे. कायमच शांतपणे खेळावर लक्ष देत आणि खेळाडूंशी चर्चा करत तो खेळत असतो. राहुल फार कमी वेळेस भडकताना किंवा ओरडताना आपल्याला दिसतो. पण चेन्नईविरूद्धच्या सामन्यात मात्र तो थेट आपली जागा सोडून रागात पंचांशी बोलण्यासाठी गेला. यावेळेस केएल चांगलाच वैतागलेला दिसत होता. पण नेमकं सामन्यात काय घडलं होतं, जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चेन्नईच्या डावातील १८ व्या षटकात हा किस्सा घडला. यश ठाकूर या षटकात गोलंदाज होता. तर शिवम दुबे स्ट्राईकवर होता. त्या षटकातील यशच्या पहिल्याच चेंडूवर मैदानावरील पंचांनी वाईड बॉल दिला. हे राहुलला अजिबातचं पटलं नाही आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी तो पंचांजवळ गेला आणि त्यांच्याशी चर्चा करताना दुबे अक्रॉस द लाइन जाऊन खेळला. पण पंचांनी मात्र त्याचं ऐकलं नाही आणि डीआरएस घेण्याचा पर्याय त्याला दिला.

पंचांशी बोलून पुन्हा जागेवर येत असताना राहुल दुबेशी काहीतरी बोलताना दिसला. तेव्हाही राहुल चांगलाच भडकला होता. तो बोलत बोलतच त्याच्या जागेवर परतला. त्यानंतर त्याने फिल्ड पुन्हा सेट केली. त्यावेळेस चेन्नईचा संघ ३ बाद १६३ धावांवर खेळत होता. ऋतुराज आणि शिवम दुबे चांगलीच फटकेबाजी करत मैदानावर होते. त्यामुळे अतिरिक्त एक धाव गेल्याने राहुलचा पारा चढला आणि त्याचं एक भडकलेलं रूपही पाहायला मिळालं.

आयपीएल मधील एलएसजीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, सीएसके विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाने ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ जिंकले आहेत. मागील सामन्यात लखनऊने चेन्नई सुपर किंग्जचा एकतर्फी ८ गडी राखून पराभव केला होता. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली एलएसजी सध्या ८ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.