KL Rahul Celebration After Delhi Capitals win IPL 2025: केएल राहुलच्या ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरूद्ध गमावलेला सामना जिंकला. केएल राहुलने या सामन्यात ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मूळचा बंगळुरूचा असलेल्या केएल राहुलने त्याच्या घरच्या मैदानावर आरसीबीविरूद्ध उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयाच्या हिरो ठरला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर राहुलने केलेल्या सेलिब्रेशन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
केएल राहुलने दिल्लीला विजयासाठी एक धावेची गरज असताना शानदार षटकार लगावला. त्यानंतर बॅट उभी जमिनीवर आदळली आणि आपल्या विजयाचं सेलिब्रेशन केलं. केएल राहुल सध्या उत्कृष्ट फॉर्मात असून संघासाठी हे त्याचं दुसरं अर्धशतक आहे. राहुलने १७५ च्या स्ट्राईक रेटने धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
केएल राहुलने जमिनीवर बॅट आदळत विजयाचं आक्रमक सेलिब्रेशन केलं आणि त्याने खुणवत हे माझं होमग्राऊंड असल्याचं सर्वांना दाखवलं. राहुलने खेळीनंतर खाली जमिनीकडे हात दाखवला आणि त्यानंतर स्वत:कडे बोट दाखवत कमालीचं सेलिब्रेशन केलं. राहुलच्या त्याच्या आक्रमकतेचं एक कारण म्हणजे बेंगळुरू हे त्याचं होमग्राउंड आहे आणि आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी अशी चर्चा होती की आरसीबी संघ केएल राहुलला खरेदी करू शकतो पण तसे झाले नाही.
केएल राहुलला आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आणि आता तो या हंगामात पहिल्यांदाच बंगळुरूच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरला आणि मॅचविनर ठरला. म्हणूनच सामना संपल्यानंतर केएल राहुलने हेच त्याचं घरचं मैदान असल्याचे खुणावत सांगितले. केएल राहुल यंदा आक्रमक खेळ खेळताना दिसत आहे.
सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार घेतल्यावरही केएल राहुलने त्याच्या विजयाच्या सेलिब्रेशनबद्दल सांगितलं. दिल्लीच्या विजयानंतर राहुल म्हणाला, “ही खेळपट्टी थोडी अवघड होती. २० षटकं विकेटच्या मागे राहून खेळपट्टी कशी आहे, याचा मी अंदाज घेतला. विकेटकिपिंग करताना मी पाहिलं की चेंडू बॅटवर कसा येत आहे, त्यामुळे मला कसे शॉट खेळायचे आहेत याची माहिती होती.”
पुढे राहुल म्हणाला, “मला फक्त एक चांगली सुरूवात करायची होती. आक्रमक सुरूवात करून नंतर खेळी पुढे न्यायची होती. जर मला षटकार मारायचा आहे, तर मला माहित होतं कोणती बाजू मी टार्गेट करू शकतो. विकेटकिपिंगमुळे मला कळलं की इतर फलंदाज कसे खेळले आणि ते कुठे बाद झाले. माझा कॅच ड्रॉप झाला, मी नशीबवान होतो.” राहुल अखेरीस म्हणाला, “हे माझं होमग्राऊंड आहे, कोणाहीपेक्षा जास्त मला याची सर्वात जास्त माहिती आहे. या मैदानावर खेळायला मजा येते.” केएल राहुलच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd