KL Rahul Completes 7000 Runs In T20: आयपीएलच्या ३०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सात धावांनी पराभव केला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ केवळ ७ बाद १२८ धावाच करू शकला. त्यामुळे एलएसजीने हातातोंडाशी आलेला सामना सात धावांनी गमावला. दरम्यान या सामन्यात कर्णधार केएल राहुलने एक मोठा कारनामा केला आहे.

भारतीय फलंदाज आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. केएल राहुल टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद ७००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. केएल राहुलने या बाबतीत माजी भारतीय कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. केएल राहुल सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे, पण त्याचा स्ट्राइक रेट चर्चेचा विषय ठरत आहे.

Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

सर्वात जलद ७००० धावा करणारा फलंदाज ठरला –

उजव्या हाताचा फलंदाज केएल राहुलने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२३ च्या ३०व्या सामन्यात ही कामगिरी केली. केएल राहुलने या सामन्यात आपली १४वी धाव घेताच मोठा पराक्रम केला. तो टी-२० क्रिकेट (टी-२०आंतरराष्ट्रीय, डोमेस्टिक टी-२० क्रिकेट आणि टी-२ लीग क्रिकेट) मध्ये ७००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला. केएल राहुलने २०० पेक्षा कमी डावांमध्ये हा पराक्रम केला आहे, तर विराट कोहलीने २०० हून अधिक डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – Virat Kohli: ‘मी मैदानावर कोणाशीही कधीच मारामारी करु शकत नाही, पण असं झालं तर…’; विराट कोहलीने व्यक्त केली भीती

राहुलने विराट कोहलीला मागे टाकले –

विराट कोहलीने २१२ डावात ७००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर केएल राहुलने १९७ व्या डावात हा आकडा पूर्ण केला. शिखर धवन २४६, सुरेश रैना २५१ आणि रोहित शर्मा यांनी टी-२० क्रिकेटमध्ये २५८ डावात ७००० धावा पूर्ण केल्या. मात्र, या सर्वांमध्ये केएल राहुलचा स्ट्राइक रेट जास्त आहे. त्याने १३६ च्या स्ट्राईक रेटने ६६ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळून हा आकडा गाठण्यात यश मिळवले आहे. केएल राहुलने आयपीएलमध्ये ४१०० हून अधिक धावा केल्या आहेत.