KL Rahul’s Response to Critics: भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधार असलेला केएल राहुल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान राहुलला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. दोन सामन्यांत त्याने केवळ ३७धावा केल्या. यानंतर त्याला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले.

राहुलने कसोटीनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी सुधारली असली, तरी सोशल मीडियावर तो टीकाकारांच्या निशाण्यावर राहिला. आयपीएलमध्येही त्याच्या खराब स्ट्राईक रेटमुळे त्याची चर्चा झाली होती. राहुल सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्याबद्दल त्याने एका पॉडकास्टमध्ये प्रतिक्रिया दिली. यादरम्यान राहुल म्हणाला की, कोणत्याही खेळाडूला खराब कामगिरी करायची नसते.

Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sujay Vikhe Patil On Vidhan Sabha Election 2024
Sujay Vikhe Patil : “नशीबात गडबड, माझं काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतं”, सुजय विखेंचं विधान चर्चेत
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी

‘क्रिकेटशिवाय काही माहित नाही’ –

सोशल मीडियावर ट्रोल झाल्याबद्दल राहुल म्हणाला, “कधीकधी माझ्यावर परिणाम होतो. इतर खेळाडूंवरही परिणाम होतो. जेव्हा आम्हा खेळाडूंना खरोखर समर्थनाची गरज असते, तेव्हा लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे टिप्पणी करण्याची किंवा नाही म्हणण्याची शक्ती आहे. ते आपले मत मांडतात. आमच्यापैकी कोणालाही वाईट कामगिरी करायची नसते. हे आमचे जीवन आहे. आपण सर्वजण हे करतो. मी म्हटल्याप्रमाणे, मला क्रिकेटशिवाय दुसरे काही माहित नाही. मी एवढेच करतो.”

हेही वाचा – Virat Kohli: ‘जा आणि पुढच्या पिढीचे नेतृत्व करा…’, शुबमन गिलच्या शतकावर कोहलीच्या प्रतिक्रियेने जिंकली चाहत्यांची मने

परिणाम मला हवे तसे मिळाले नाहीत –

राहुल म्हणाला, “मी माझ्या खेळाबाबत गंभीर नाही यावर कोणी विश्वास का ठेवेल? की मी पुरेसा प्रयत्न करत नाहीये? आणि दुर्दैवाने खेळांमध्ये कोणतेही कनेक्शन नाही. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कठोर परिश्रम करू शकता, जसे की मी कठोर परिश्रम केले. परंतु परिणाम मला हवे तसे मिळाले नाहीत.”

राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार नाही –

राहुलच्या उजव्या मांडीच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुलला या महिन्याच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. ३१ वर्षीय राहुल क्षेत्ररक्षण करताना अडखळला आणि जमिनीवर पडला. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधूनही बाहेर पडला.