Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL Latest Update: आयपीएलच्या १६व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात लखनऊ संघाचा कर्णधार के.एल. राहुल क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्याने मैदानाबाहेर गेला. राहुल सहकारी खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर गेला. यानंतर त्याच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्याने संघाची कमान सांभाळली आहे. या सामन्यात आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनऊमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर दुसरी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. रवी बिश्नोई आणि कृणाल पांड्या व्यतिरिक्त अमित मिश्रा लखनऊसाठी फिरकीच्या सहाय्याने खेळपट्टीवर खेळेल याची खात्री आहे. त्याच वेळी, जर खेळपट्टी फलंदाजांना उपयुक्त असेल, तर दोन्ही संघांना एका अतिरिक्त फलंदाजाला संधी द्यायला आवडेल, कारण अतिरिक्त फलंदाज धावा करण्यात आणि मोठे लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल. मात्र याच दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

आरसीबीच्या डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, फॅफ डू प्लेसिसने कव्हरच्या दिशेने शॉट मारला, जो के.एल. राहुल थांबण्यासाठी धावला पण सीमारेषेपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याच्या उजव्या पायात ताण पडल्यामुळे तो थांबला. त्याच्या तो उजवा पायाचे स्नायू हे थोडेसे जखडले गेले. त्याने ज्यावेळी डाइव्ह मारली त्यावेळी त्याचा पाय हा वाकडा झाला आणि मग तो वेदनेने व्हीवळू लागला. यानंतर संघाच्या फिजिओसह इतर खेळाडू तेथे पोहोचले आणि सहकारी खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर काढण्यात आले. स्टेडियममध्ये उपस्थित लोकेश राहुलची पत्नी अथिया शेट्टीही खूप काळजीत दिसत होती. तसेच, सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.

लखनऊचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे

या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी आतापर्यंत प्रभावी ठरली आहे, ज्यामध्ये त्यांनी ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत, त्यानंतर संघ सध्या गुणतालिकेत १० गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध ५६ धावांनी मोठा विजय नोंदवला होता, ज्यामध्ये संघाने २५७ धावा केल्या, आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या.

हेही वाचा: Ravi Shastri: “नको त्या लोकांना निवड समितीमध्ये BCCI…” माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या विधानामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नवा वाद

हे दोन्ही संघ आहेत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

बंगळुरूचे इम्पॅक्ट खेळाडू: हर्षल पटेल, शाहबाज अहमद, विजयकुमार वैशाक, मायकेल ब्रेसवेल आणि सोनू यादव.

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, यश ठाकूर.

लखनऊचे इम्पॅक्ट खेळाडू: आयुष बडोनी, डॅनियल सायम्स, आवेश खान, क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मांकड.