KL Rahul Injury Update: भारताचा वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलच्या उजव्या मांडीचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशननंतर तो म्हणामा की, “शक्य तितक्या लवकर राष्ट्रीय संघात परतण्याचा त्याचा निर्धार आहे.” इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लखनऊ सुपरजायंट्सच्या सामन्यादरम्यान ३१ वर्षीय राहुलला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो आयपीएलचे उर्वरित सामने आणि जून महिन्यात इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे.

आपल्या सोशल मीडिया हँडलवर ऑपरेशनची माहिती देताना राहुलने लिहिले की, “माझे नुकतेच एक ऑपरेशन झाले जे यशस्वी झाले. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे खूप आभार ज्यांनी संघाला खात्रीकरून दिली की मी आरामात आहे आणि सर्व काही सुरळीत चालले आहे. लवकरच मी पुनरागमन करेन. मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी तयार आहे का हे येणारा काळचं ठरवले.”

Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव

पुढे त्याने लिहिले आहे की, “सर्वांना नमस्कार, माझी शस्त्रक्रिया पूर्ण झाली, जी यशस्वी झाली. मी आरामात आहे आणि सर्व काही सुरळीत चालले आहे माझी काळजी घेतल्याबद्दल डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार. संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करेन, मैदानात परतण्याचा आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे. इथून पुढेच जायचे आहे!”

के.एल. राहुलच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टवर त्याचे सासरे आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच वेळी, के.एल. राहुलची पत्नी अथिया शेट्टीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राहुलची ही पोस्ट शेअर केली आणि हृदय आणि इविल आयची इमोजी बनवली. के.एल. राहुलच्या या इंस्टाग्राम पोस्टवर सूर्यकुमार यादव, शिखर धवनसह अनेक क्रिकेटपटूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच चाहत्यांनीही त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. के.एल. राहुलच्या या पोस्टवर त्याचे सासरे सुनील शेट्टी यांनीही कमेंट केली आहे. सुनील शेट्टीने राहुलच्या या पोस्टवर हार्ट आणि फिंगर क्रॉसचा इमोजी टाकला आहे.

हेही वाचा: IPL2023: “असं वाटल जसकाही कॉम्प्युटरवर बॅटिंग…”, सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी पाहून सौरव गांगुलीही झाला आश्चर्यचकित

७ ते १२ जून दरम्यान लंडनमधील ओव्हल येथे होणाऱ्या WTC फायनलसाठी राहुलच्या जागी इशान किशनला संघात स्थान दिले आहे. राहुलने मात्र भारतीय संघात लवकरात लवकर पुनरागमन करायचे असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “आता मी अधिकृतपणे दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. मी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. भारतासाठी खेळाचे तिन्ही फॉरमॅट खेळलेल्या राहुलने या वर्षाच्या अखेरीस आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”