World Test Championship Final 2023 Latest Update : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज के एल राहुल जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. के एला राहुलला आयपीएलमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे राहुल आता यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यालाही मुकणार आहे, असं माहिती सूत्रांनी दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात झालेल्या सामन्यात राहुलला गंभीर दुखापत झाली.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, के एल राहुल दुखापतीमुळं स्कॅनिंगसाठी मुंबईत परतला आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीबाबत माहिती मिळणार आहे. बीसीसीआय आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून के एल राहुलबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीय. राहुलची दुखापत गंभीर असल्यास तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार नाही. राहुलला हॅमस्ट्रिंग किंवा हिप इंजरी झाल्याचं बोललं जात आहे. १० महिन्यांपूर्वीच राहुलने हार्नियाची शस्त्रक्रिया केली होती.
लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत केएल राहुलच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाहीय. लखनऊचे लीग स्टेजमध्ये आणखी चार सामने राहिले आहेत. जर टीम प्ले ऑफमध्ये गेली, तर त्यांना आणखी सामने खेळावे लागतील. आता सध्या कृणाल पांड्या लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृ्त्व करत आहे. आयपीएलचे लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलसाठी लंडनला रवाना होणार आहे.