KL Rahul revealed about Nicholas Pooran: आयपीएल २०२३ मध्ये आज लखनऊ सुपरजायंट्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लढत आहे. लखनऊच्या संघाने आपला पहिला सामना जिंकला आहे, तर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. लखनौचा कर्णधार केएल राहुल पहिल्या विजयाने खूश झाला आहे. या विजयानंतर कर्णधार केएल राहुलने निकोलस पूरनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

निकोलस पूरनला लखनऊ फ्रँचायझीने लिलावादरम्यान १६ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यावेळी या खरेदीवर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेक माजी क्रिकेटपटूंना आश्चर्य वाटले की पूरणला एवढ्या महागात कशासाठी विकत घेतले गेले? ज्या वेळी पूरणला आयपीएलमध्ये इतका महाग विकला गेला, त्याचवेळी त्याच्याकडून वेस्ट इंडिजचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. त्याचा फॉर्म चांगला नसल्यामुळे त्याची १६ कोटी रुपयांना विक्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आता केएल राहुलने पुरणवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आम्हाला संघात बहुतांश अष्टपैलू खेळाडू हवे होते –

केएल राहुलने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “या मोसमासाठी आम्हाला मधल्या फळीतील एका खेळाडूची गरज होती. जो स्फोटक फलंदाजी करतो आणि उत्तम फिनिशिंग कौशल्ये असलेला, त्यामुळे निकोलस पूरन आमची पहिली पसंती होती. त्यामुळे त्याला विकत घेतल्यानंतर आम्ही खूप उत्साहित होतो.”

हेही वाचा – Jos Buttler & Yuzvendra Chahal: ‘…म्हणून आवडता शॉट खेळलो नाही’; चहलच्या प्रश्नाला उत्तर देताना बटलरचा खुलासा, पाहा VIDEO

केएल राहुल पुढे म्हणाला, “लिलावादरम्यान संजीव सर आणि गौतम गंभीर यांच्यासह सर्व सपोर्ट स्टाफने स्पष्ट केले होते, आम्हाला आमच्या संघात अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करायचा आहे. अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्याचा आमचा प्रयत्न होता, जे चेंडू आणि बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.”

राहुल म्हणाला की, “सध्या टी-२० क्रिकेटमध्ये हा ट्रेंड सुरू आहे, सर्व यशस्वी संघांच्या संघात अधिकाधिक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे तुम्हाला स्टोइनिस, कृणाल पांड्या, जेसन होल्डर आणि दीपक हुडा सारखे खेळाडू आमच्या संघात आहेत. जे फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतात.

पूरनने आयपीएलमध्ये केवळ ४ अर्धशतके झळकावली आहेत –

केएलने पुढे म्हणाला, “आयपीएलमधील लखनऊ संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंची प्रतिभा मला माहीत आहे. कारण मी या खेळाडूंसोबत याआधीही खेळलो आहे. त्यामुळे एक क्रिकेटर म्हणून ते काय करू शकतात हे मला माहीत आहे. मोसमाची सुरुवात आमच्यासाठी चांगली झाली आहे, पण आम्हाला भविष्यात चांगले क्रिकेट खेळायचे आहे तरच आम्ही यशस्वी होऊ शकू.”

हेही वाचा – IPL 2023: मुंबईविरुद्धच्या विजयानंतर कोहलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “मला अभिमान आहे की आरसीबी आठ वेळा…”

केएल राहुल ज्या कॅरेबियन खेळाडूला सपोर्ट करत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलचे ४७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ ४ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातही निकोलस पूरनने २१ चेंडूत ३६ धावांची खेळी केली होती.

Story img Loader