Equation Of RCB And LSG Match : आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ आणि आरसीबी यांच्यात जेव्हा सामना झाला होता, त्यावेळी आरसीबीचा संघ विजयी झाला होता. आरसीबीचा विजय तर झालाच होता, परंतु, त्या सामन्यात नवीन उल हक, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि गौतम गंभीर यांनी जास्त रोमांच आणला होता. या सामन्यात विराट कोहलीची नवीन आणि गौतमसोबत शाब्दिक चकमक उडाली होती. सामना संपल्यानंतर या वादविवादाला सुरुवात झाली होती. तसच मोहम्मद सिराज आणि नवीन उल हक यांच्यातही खटके उडाले होते. आयपीएल २०२३ मधील हा सर्वात मोठा वाद होता, ज्यामुळं संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटले असून कोहलीचे चाहते गौतम आणि नवीनला भर मैदानात कोहली कोहली घोषणा देऊन डीवचण्याचा प्रयत्न करतात. कोलकाता आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यातही अशाच प्रकारचा नजारा पाहायला मिळाला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चाहत्यांना लखनऊ आणि आरसीबीचा सामना पाहायला मिळू शकतो. हा सुपरहिट सामना पुन्हा झाला तर चाहत्यांची रिअॅक्शन कशी असेल, या विषयावर आतापासूनच चर्चांना उधाण आलं आहे.

नक्की वाचा – जॉस ‘द बॉस’ नाही! बटलरच्या नावावर IPL चा सर्वात लाजिरवाणा विक्रम, ‘अशी’ खराब कामगिरी करणारा बनला एकमेव फलंदाज

RCB विरुद्ध LSG चा सामना पुन्हा होणार का? ‘असं’ आहे समीकरण

कोलकाताविरुद्ध सामना जिंकल्यानंतर लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा संघ यांच्यापैकी कोणताही एक संघ क्वालिफाय करु शकतो. जर बंगळुरु क्वालिफाय करण्यात यशस्वी झाली, तर प्ले ऑफ मध्ये पुन्हा एकदा आरसीबी आणि लखनऊचा सामना होऊ शकतो. पण मुंबईने हैदराबादविरुद्ध खूप मोठ्या फरकाने सामना जिंकला, तरच अशाप्रकारचं समीकरण पाहायला मिळू शकतं. जर असं झालं तर, पुन्हा एकदा कोहली विरुद्ध गंभीर, कोहली विरुद्ध नवीन उल हक आणि सिराज विरुद्ध नवीन उल हक आमनेसामने येऊ शकतात.

RCB प्ले ऑफमध्ये कशी पोहोचणार?

आरसीबीने जर शेवटच्या सामन्यात गुजरातचा पराभव केला आणि नेट रनरेटमध्ये मुंबईच्या पुढे गेली, तर बंगळुरु प्ले ऑफ मध्ये प्रवेश करेल. कारण नेट रनरेटनुसार बंगळुरुचा रनरेट मुंबई इंडियन्सपेक्षा चांगला आहे. आजच्या सामन्यात गुजरातचा पराभव झाला आणि मुंबई शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाली, तर आरसीबीचा प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about ipl 2023 play off equation of royal challengers bangalore and lucknow super giants virat kohli vs gautam gambhir nss