IPL 2023, CSK vs MI : आयपीएल २०२३ चा १२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे मैदानावर आज सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नईने दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई आणि चेन्नईत नेहमीच रंगतदार लढत होत असते. दोन्ही संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ घरेलू मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मुंबई इंडियन्सचा रविवारी झालेल्या सामन्यात ८ विकेट्सने पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३४ सामने झाले असून मुंबई इंडियन्सने २० सामने जिंकले आहेत.
अशी असेल चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग ११
चेन्नईला मुंबई इंडियन्स विरोधात होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मोईन अली आणि सेंटनरच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. चेन्नईचा संघ अंतिम इलेव्हनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला संधी देण्याचा विचार करू शकतात. सटीक यॉर्कर टाकून फलंदाजांची दांडी गुल करण्यात सिसांडा माहीर आहे. अंतिम इलेव्हनमध्ये सिसांडा सामील झाल्यावर सेंटनरला बाहेर बसावं लागू शकतं.
संभाव्य प्लेईंग ११
डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, मोइन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शिवम दूबे, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, आरएस हंगरगेकर
अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेविड, नेहल वढेरा, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, जोफ्रा आर्चर, अरशद खान</p>
हे खेळाडू असू शकतात इम्पॅक्ट प्लेयर
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, एस सेनापती, एस राशीद, एन सिंधू, तुषार देशपांडे
मुंबई इंडियन्स : ए रावत, आर सिंह, जे बेहरेनडॉफ, एस मुलानी, एस वारियर