IPL 2023 Prize Money: आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेतील फक्त दोन मुख्य सामने बाकी आहेत. यामध्ये दुसरा क्वालिफायर आणि फायनल सामना होणार आहे. यापैकी दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना करेल.

पहिला क्वालिफायर सामना २६ मे रोजी होणार आहे. त्याचबरोबर फायनल सामना २८ मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील विजेत्यासोबतच उपविजेत्यालाही कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. याशिवाय ऑरेंज कॅप विजेत्या आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंनाही पुरस्कारासह लाखो रुपये देण्यात येणार आहेत.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Sunil Gavaskar and others felicitated by MCA at Wankhede Stadium
वानखेडे स्टेडियमचे योगदान महत्वाचे! सुनील गावस्कर यांची भावना; तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने क्रिकेट पंढरी दुमदुमली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्याकडे या हंगामात ऑरेंज कॅपवर अजूनही कायम आहे. पण गुजरात टायटन्स संघाचा एक भाग असलेला शुबमन गिल त्याला मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मागे सोडू शकतो. फाफच्या सध्या ७३० धावा आहेत, तर गिलने आतापर्यंत ७२२ धावा केल्या आहेत. या मोसमात कोणता पुरस्कार, किती बक्षीस रक्कम दिली जाणार यावर एक नजर टाकूया.

आयपीएल विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील विजेत्या संघाला २० कोटी रुपये आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

या हंगामातील अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून १३ कोटी रुपये दिले जातील.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनल जिंकणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू बनणार कोट्याधीश, जाणून घ्या बक्षिसाची रक्कम

ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला किती बक्षीस रक्कम मिळेल?

या हंगामात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

पर्पल कॅप विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?

या हंगामात पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला म्हणजे सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

हेही वाचा – IPL 2023 च्या फायनलचे तिकिट घेण्यासाठी लागल्या प्रेक्षकांच्या रांगा, गर्दीमुळं झाली धक्काबुक्की आणि मारामारी, पाहा VIDEO

सुपर स्ट्रायकर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला किती बक्षीस रक्कम मिळेल?

या हंगामात सुपर स्ट्राइक पुरस्कार जिंकणाऱ्या फलंदाजाला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

उदयोन्मुख खेळाडूला किती बक्षीस रक्कम मिळेल?

१ एप्रिल १९९५ नंतर जन्मलेले आणि ५ पेक्षा जास्त कसोटी तसेच २० पेक्षा कमी एकदिवसीय सामने न खेळलेल्या खेळाडूंचा या पुरस्कार यादीत समावेश आहे. याशिवाय त्या खेळाडूने आयपीएलमध्ये २५ पेक्षा कमी सामने खेळले असावेत. या हंगामात उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून २० लाख रुपये दिले जातील.

Story img Loader