Mumbai Indians Playoffs Equation : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला मुंबई इंडियन्स संघाने नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली. मात्र, पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्या सलग ३ सामन्यात संघाचा पराभव झाला होता. या पराभवातून सावरत संघाने सलग दोन विजयांची नोंद केली. परंतु शेवटच्या दोन पराभवांमुळे त्यांचा प्लेऑफमधील मार्ग कठीण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धबाजी मारून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता, पण शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पराभवाने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायला आला होता. प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावा केल्या. सलामीला आलेल्या जेक फ्रेजरने अवघ्या २७ चेंडूत ६ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८४ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाला कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माच्या अर्धशतकानंतरही केवळ २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे १० धावांनी पराभव पत्कारावा लागला.

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

मुंबईचा मार्ग झाला कठीण –

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग थोडा कठीण झाला आहे. ९ सामने खेळल्यानंतर संघ केवळ ३ विजय नोंदवू शकला आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु एक चूक महागात पडू शकते. मुंबईला उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील. असे केल्याने संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो.

हेही वाचा – IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’

मुंबईविरुद्ध कोणकोणत्या संघांचे सामने बाकी आहेत?

आता मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दोन सामने आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. सनरायझर्स हैदराबादशी एक सामना आहे. मुंबईसाठी अडचण अशी आहे की या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या हैदराबाद आणि कोलकाता संघांचा सामना करायचा आहे. यापैकी हैदराबादने मुंबईविरुद्ध आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती.

Story img Loader