Virat Kohli’s Performance vs Sunrisers Hyderabad: आयपीएल २०२३ मधील ६५ वा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. प्लेऑफचे सामने लक्षात घेता हा सामना आरसीबीसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपावी, अशी आरसीबीच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. पण त्याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याचा विक्रम कसा आहे हे जाणून घेऊया.

विराट कोहलीची हैदराबादविरुद्ध असलेली आकडेवारी –

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विराट कोहलीची आकडेवारीबद्दल बोलायचे, तर कोहली हैदराबादविरुद्धच्या मागील दोन डावात गोल्डन डकचा (पहिल्या चेंडूवर बाद होणे) बळी ठरला आहे. त्याच वेळी, कोहलीने हैदराबादविरुद्ध आतापर्यंत एकूण २० डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३१.६च्या सरासरीने आणि १३६.८च्या स्ट्राइक रेटने ५६९ धावा केल्या आहेत.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतके झळकली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ९३ आहे, जी त्याने २०१३ मध्ये केली होती. त्याचवेळी २०१६ मध्ये हैदराबादविरुद्ध त्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्याचवेळी, हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या २० डावांमध्ये कोहली एकूण ३ वेळा खाते न उघडता ० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. याशिवाय त्याच्या बॅटमधून ५४ चौकार आणि २१ षटकार आले आहेत.

हेही वाचा – PBKS vs DC: इशांत शर्माच्या नो बॉलवर उठले प्रश्न, चाहत्यांना ‘या’ दोन सामन्यांची झाली आठवण

आयपीएल २०२३ मध्ये, पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, मागील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये कोहली दोन्ही डावात गोल्डन डकचा बळी ठरला होता.

आरसीबीला प्लेऑफसाठी दोन्ही सामने जिंकणे आवश्यक –

प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. हैदराबादनंतर आरसीबीचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. दोन्ही सामने जिंकूनही संघाला काही संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. आता आरसीबी या मोसमात पात्र ठरू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.