Naveen ul Haq and Virat Kohli Argument: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक सतत चर्चेत आहे. विराट कोहलीसोबतच्या वादानंतर त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने त्याला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंडही ठोठावला आहे.अफगाणिस्तानचा हा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीपेक्षा विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आला आहे. नवीन उल हक कोण आहे जाणून घेऊया.

लहानपणी भारत आवडता संघ होता –

१९९९ मध्ये काबूलमध्ये जन्मलेल्या नवीनचे बालपण पाकिस्तानमध्ये गेले. अफगाणिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंब पाकिस्तानात राहत होते. यावेळी अफगाणिस्तानचा संघ सहयोगी संघही नव्हता आणि भारत हा नवीनचा आवडता संघ होता. इरफान पठाण, एस श्रीशांत आणि झहीर खान यांसारखे खेळाडू त्याला खूप आवडायचे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना

नवीन नेहमी भावाशी भांडण करायचा –

नवीन लहानपणापासूनच भावासोबत टेप बॉल क्रिकेट खेळायचा. तो यष्टिरक्षक फलंदाज होता. मात्र, दोन्ही भावांमध्ये नेहमीच भांडण व्हायचे आणि दोघेही एकमेकांविरुद्ध खेळायचे. नवीनने जेव्हा पहिल्यांदा लेदर बॉल पाहिला तेव्हा त्याने गोलंदाज बनून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. भावाची मदत मिळाल्यावर वडिलांनीही होकार दिला आणि नवीनला क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळाला.

हेही वाचा – Virat Kohli Controversies: आधी कुंबळे…मग गांगुली…आता अमित मिश्रा आणि गौतम गंभीर, कोहली वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या वादावरून होतोय ट्रोल

नवीनने सुरुवात अगदी साधारम केली, पण कालांतराने तो एक चांगला गोलंदाज बनला. पाकिस्तानातून परतल्यानंतर तो वयाच्या ११ व्या वर्षी अफगाणिस्तानच्या १६ वर्षांखालील संघाकडून खेळत होता. जेव्हा तो १५ वर्षांचा झाला, तेव्हा तो देशाच्या अंडर-१९ संघाचा भाग बनला. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने आपल्या देशाच्या मुख्य संघासाठी पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

हेही वाचा – RCB vs LSG: लखनऊच्या खेळाडूंशी झालेल्या वादानंतर विराट कोहलीची ‘ती’ इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल, जाणून घ्या काय आहे?

नवीनचे शाहिद आफ्रिदीशीही झाले होते भांडण –

नवीन-उल-हक याआधीही भांडणामुळे चर्चेत राहिला आहे. २०२० मध्ये श्रीलंका प्रीमियर लीगच्या सामन्यात नवीनचा मोहम्मद अमीर आणि नंतर शाहिद आफ्रिदीशी वाद झाला होता. गॅले ग्लॅडिएटर्सच्या १८व्या षटकात आमिर फलंदाजी करत होता. यादरम्यान त्याने नवीनच्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर दोघांमध्ये मैदानावर वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इनिंग संपल्यानंतर आफ्रिदी नवीनकडे आला आणि म्हणाला, ‘बेटा, तुझ्या जन्माआधी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे.’ मॅच संपल्यानंतरही आफ्रिदी आणि नवीनमध्ये वाद झाला होता. आफ्रिदी खूप रागात दिसत होता.

नवीन-उल-हकने विराटशी पंगा घेतला –

बंगळुरू आणि लखनऊ यांच्यातील सामन्यादरम्यान नवीनचे विराट कोहलीसोबत भांडण झाले. लखनऊच्या डावाच्या १७व्या षटकात अमित मिश्रा नवीनसोबत क्रीजवर होता आणि त्यादरम्यान विराट आणि नवीन यांच्यात चकमक झाली. नवीन विराटकडे आला, काहीतरी बोलला आणि बोलता बोलता परत गेला. त्यानंतर विराट अंपायरशी काहीतरी बोलला. बोलत असताना त्याने उजवा पाय वर केला आणि बुटाच्या तळव्यातून माती बाहेर काढली. यादरम्यान विराट काहीतरी बोलत होता. त्यामुळे नवीनने विराट कोहलीशी वादावादी सुरु केली. सामना संपल्यानंतरही दोघांत वाद झाला.

Story img Loader