Virat Kohli Angry in Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे चाहत्यांचे सर्वात आवडते कपल मानले जाते. अनेकदा दोघेही एकत्र एकत्र फिरायला जातात तेव्हा ते त्यांच्या चाहत्यांशी अतिशय सभ्यपणे वागतात. नुकत्याच एका लंच डेट दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का गेलेले असताना अचानक त्यांना तिथे पाहून चाहते गर्दी करू लागले. पण यादरम्यान एक चाहता सेल्फी घेण्यासाठी अनुष्काच्या जवळ येऊ लागल्याने विराट कोहलीला राग आला. हे पाहिल्यानंतर विराट कोहलीचा संयम सुटताना दिसला आणि तो त्या चाहत्यावर भडकला.

‘सेंट्रल टिफिन रूम’ने फोटो शेअर केले की विराट आणि अनुष्का वीकेंडला एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले जसे ही बातमी लोकांना कळले तसे ते त्या ठिकाणी गर्दी करू लागले. सेलिब्रिटी कपलचे फोटो काढण्यासाठी रेस्टॉरंटबाहेर लोकांची गर्दी जमली होती. या संदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुष्का आणि विराट रेस्टॉरंटमधून सुखरूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अचानक त्यादरम्यान सेल्फी घेताना एक व्यक्ती या जोडप्याच्या अगदी जवळ आला आणि हे पाहून विराटचा पारा चढला.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

हे जोडपं सहसा कोणावर चिडत नाही पण अचानक एवढी जमा झालेली गर्दी आणि तो मध्येच जवळ आलेला व्यक्ती त्यामुळे किंग कोहली संतापला. विराट कोहली हा त्याच्या चाहत्यांसोबत नेहमी खूप शांत, संयमीपणे वागतो. त्यांच्यासोबत हसतो, गप्पा मारतो, सेल्फी काढतो, ऑटोग्राफ देतो. पण काहीवेळा चाहते त्यांच्या आवडत्या सेलेब्सलाही फोटोंच्या निमित्ताने त्यांना खूप अस्वस्थ करतात. यावेळीही मग थोडसं वातावरण बिघडत आणि असं काहीसं घडत. चाहत्यांची गर्दी वाढत असल्याचे पाहून अनुष्का आणि विराट दोघेही इतके अस्वस्थ दिसले की त्यांनी चाहत्यांना बाजूला होण्यास सांगितले.

हेही वाचा: WTC Final 2023: रहाणेला आयपीएल पावले! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण संघ

व्हायरल व्हिडिओ

आता अनुष्का आणि विराटचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराटच्या गोपनीयतेचा आदर करत नसल्याबद्दल चाहत्यांवर आता टीका होत आहेत, तर अनेकांचे म्हणणे आहे की “कोहली खूप रागात दिसत होता.” एका यूजरने सांगितले की, “अनुष्का आणि विराटभोवती एवढी गर्दी पाहून अजिबात आनंद होत नाही.” त्यातील काही चाहते व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापले.

दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “जेव्हा सेलेब्रिटी अशा प्रकारे चाहत्यांकडून घेरले जातात तेव्हा वाईट वाटते. विशेषत: जेव्हा ते कौटुंबिक सहलीसाठी बाहेर असतात तेव्हा त्यांचे ते वैयक्तिक आयुष्य असते आणि त्यात लोकांनी दखल देण्याची काहीही गरज नसते.” तिसरा एक यूजर म्हटला की, “कोहली हॉटेल बाहेर पडताच खूप अस्वस्थ दिसत होता. हे काही आश्चर्य नाही की काहीवेळा चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना खूप चांगले किंवा आदराने वागवत नाहीत.”

रेस्टॉरंटमधील व्हायरल फोटो

नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ‘सेंट्रल टिफिन रूम’मध्ये गेले होते, जिथे त्यांना खाण्यासाठी एक सेपरेट खासगी जागा देण्यात आली होती. घरी जाताना एका आईस्क्रीम कॉर्नरवर ते थांबले. सेंट्रल टिफिन रूमने त्यांच्या रेस्टॉरंटमधील जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की “आज येथे कोण आले आहे, ओळखला का? दिग्गज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इथे आले त्यांचा आम्हाला खूप आनंद आहे.”

Story img Loader