Virat Kohli vs Naveen-ul-Haq: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ४३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यातील वाद काही अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्या सामन्यापासून दोघेही अप्रत्यक्षपणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही आहेत. ‘किंग’ कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने पुन्हा एकदा आरसीबीच्या स्टार फलंदाजाला डिवचले आहे. मुंबईकडून बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

नवीनने बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या दिवशी एक नाही तर दोन पोस्ट टाकल्या. त्याची पहिली पोस्ट विराट कोहली बाद झाल्यानंतर तर दुसरी पोस्ट बंगळुरूच्या पराभवानंतर आली. आयपीएल २०२३च्या ४३व्या सामन्यात कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील भांडण अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्या सामन्यापासून दोघेही अप्रत्यक्षपणे एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत आहेत.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

आता नवीन उल हकने विराटची आणखी कोणती खोडी काढली?

लखनऊ सुपरजायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हक इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमधून विराट कोहलीला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई इंडियन्सकडून आरसीबीच्या पराभवानंतर नवीन-उल-हकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्याचे नाव न घेता कोहलीची खिल्ली उडवली. नवीन उल हकने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये टीव्हीवर सूर्यकुमार यादव आणि नेहल बधेरा यांचा फोटो आहे, त्याशिवाय आंबे देखील ठेवले आहेत. नवीन उल हक याने या फोटोवर लिहिले आहे… “राउंड- २ मध्ये मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी केली. हा विजय म्हणजे माझ्याकडे असणाऱ्या आजवरच्या सर्वोत्तम आंब्यांपैकी एक आहे, धन्यवाद धवल परव भाई.” नवीनने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही, मात्र सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की, त्याने विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान नवीन-उल-हकने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, या पोस्टमध्ये नवीन-उल-हकने कोणाचेही नाव न घेता कोहलीला टोमणा मारला होता. नवीन उल हकने त्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पियुष चावलाचाही फोटो टाकला, त्यासोबत त्याने आंब्याचा फोटो टाकला. या फोटोवर त्यांनी लिहिले आहे.. ‘गोड आंबा.’ नवीनच्या या पोस्टचा संबंध सोशल मीडिया यूजर्स कोहलीशी जोडताना दिसत आहेत.

अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने यापूर्वीही एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “लोकांशी तुम्ही जसे वागाल तसेच लोकं तुमच्याशी वागतील. जे तुम्ही लोकांना द्याल तेच परत तुम्हाला जसे च्या तसे मिळेल. मग ते चांगले असो किंवा वाईट.”

हेही वाचा: KKR vs PBKS, IPL 2023: ‘चिते की चाल गुरबाज की नजर’, पहिले सोडला अन् नंतर डायव्हिंग करत पकडला आश्चर्यकारक झेल, Video व्हायरल

विराटसोबत वाद झाला होता

आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यादरम्यान नवीन आणि विराटमध्ये वाद झाला होता. लखनऊची फलंदाजी सुरू होती आणि मोहम्मद सिराज डावातील १७वे षटक टाकत होता. या षटकात सिराज आणि नवीन यांच्यात काही वाद झाला. षटक संपल्यानंतर नवीन पोहोचला असतानाही सिराजने जबरदस्ती चेंडू स्टंपवर मारला. तिथून चर्चा वाढली आणि वाद झाला, मग विराट कोहलीनेही या प्रकरणात उडी घेतली. विराट आणि नवीन यांच्यातील हा वाद सामना संपल्यानंतर हस्तांदोलन होईपर्यंत सुरूच होता. सर्व खेळाडू हस्तांदोलन करत असतानाही जेव्हा विराट आणि नवीन समोरासमोर आले तेव्हा दोघांमध्ये काही संवाद झाला. यानंतर विराटने नवीनचा हात झटकला आणि तेथून प्रकरण वाढले.