litton Das Out Of IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यांसाठी विकेटकीपर लिटन दासच्या जागेवर धडाकेबाज फलंदाज जॉनसन चार्ल्सला आपल्या संघात सामील करुन घेतलं आहे. लिटन दास कौटुंबिक कारणामुळं मागील आठवड्यात बांगलादेशमध्ये परतला होता. यंदाच्या आयपीएल हंगामात २८ वर्षीय खेळाडूला केकेआरने मागील वर्षी बेस प्राईस ५० लाख रुपयांत खरेदी केलं होतं. केकेआरने त्याला फक्त एका सामन्यात खेळवला आणि त्यानंतर बाहेर केलं. जॉनसनचा केकेआरच्या संघात समावेश झाल्याने विरोधी संघातील भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे.
जॉनसन चार्ल्स वेस्टइंडिजचा विकेटकीपर फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ४२ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ९७१ धावा केल्या आहेत. त्याने एकूण २२४ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर ५६०० हून अधिक धावांची नोंद आहे. तो प्राईस ५० लाख रुपयांत केकेआरच्या संघात सामील होणार आहे. टी-२० मध्ये जॉनसन चार्ल्सने १३०.७२ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. त्यांच्या नावावर टी-२० मध्ये तीन शतक आहेत.
जॉनसन चार्लचा टीममध्ये समावेश झाल्यावर केकेआर टीम त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी देणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये केकेआर टीमने चमकदार कामगिरी केली नाहीय. यावेळी पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता आठव्या स्थानावर आहे. केकेआरचा पुढील सामना ४ मेला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध होणार आहे. केकेआरसाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे.
सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात केकेआरची संभाव्य प्लेईंग ११
जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), व्येंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसल, रिंकू सिंग, शार्दूल ठाकूर, सुनील नारायण, हर्षीत राणा, वरूण चक्रवर्ती, सुयश शर्मा