Kolkata beat Mumbai by 24 runs : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५१वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. कोलकाताने २०१३ नंतर प्रथमच वानखेडेवर मुंबईला पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १६९ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८.५ षटकांत १४५ धावांवर गारद झाला. कोलकातासाठी मिचेल स्टार्कने ४ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

आंद्रे रसेल ठरला गेम चेंजर –

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४६ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा ११ धावा, इशान किशन १३ आणि नमन धीर ११ धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ५६ धावा केल्या, त्यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकारही लगावले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबईच्या इतर कोणत्याच गोलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. त्याचबरोबर आता मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आशा संपुष्टात आल्या. वास्तविक, सामन्याचा गेम चेंजर आंद्रे रसेल ठरला, ज्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेत सामना केकेआरकडे वळवला, त्याशिवाय त्याने हार्दिक पांड्याची विकेटही घेतली. त्याचबरोबर सुनील नरेन (२), वरुण चक्रवर्ती (२) आणि मिचेल स्टार्कने (४) शानदार गोलंदाजी केली.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

व्यंकटेश अय्यरचे दमदार अर्धशतक –

तत्पूर्वी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध संघर्ष करताना दिसला. ५७ धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. मुंबईच्या गोलंदाजीसमोर सॉल्ट-नरीनसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात सॉल्टने पाच धावा, रघुवंशीने १३ धावा, श्रेयस अय्यरने सहा धावा, सुनील नरेनने आठ धावा आणि रिंकू सिंगने नऊ धावा केल्या.यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी मोर्चा सांभाळला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या पांडेला हार्दिकने बाद केले. तो ४२ धावा करून परतला. कोलकाताला १७ व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात आंद्रे रसेलला केवळ सात धावा करता आल्या.

हेही वाचा – पियुष चावलाने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी –

या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. वानखेडे स्टेडियमवर त्याने ५० विकेट पूर्ण केल्या. त्याने रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि व्यंकटेश अय्यर यांना बाद केले. अय्यरने मुंबईविरुद्ध ७० धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार आले. त्यामुळे कोलकाता संघाला १९.५ षटकात सर्वबाद १६९ धावा करता आल्या. मुंबईसाठी नुवान तुषाराने तीन, कर्णधार पंड्याने दोन आणि पियुष चावलाने एक विकेट घेतली. कोलकाता संघ १९.५ षटकात १६९ धावांवर गारद झाला.