KKR Break MI’s Best Net Run Rate Record : आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार होता, परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यासह प्लेऑफ्समधील अव्वल ४ संघही निश्चित झाले. मात्र, राजस्थानचे टॉप-२ मध्ये पोहोचण्याचे आशा धुळीस मिळाल्या. आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ पहिल्या स्थानावर आहे. केकेआरचे शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यासह केकेआरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असे करणारा तो पहिला संघ ठरला आहे.

केकेआरने मोठा विक्रम केला –

कोलकाता नाईट रायडर्सचे पॉइंट टेबलमध्ये २० गुण आहेत. इतर कोणत्याही संघाकडे इतके गुण नाहीत. नेट रनरेटच्या बाबतीतही त्याचा संघ खूप पुढे आहे. त्याने +१.४२८ च्या प्रभावी नेट रन रेटने प्लेऑफमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वोत्तम नेट रन रेट आहे. आत्तापर्यंत, लीग टप्पा संपल्यानंतर कोणत्याही संघाचा नेट रन रेट इतका जास्त नव्हता. यापूर्वी, मुंबई इंडियन्स संघाने २०२० चा लीग टप्पा +१.१०७ च्या नेट रन रेटने पूर्ण केला होता.

आयपीएल इतिहासातील टॉप- ५ सर्वोत्तम नेट रन रेट –

कोलकाता नाइट रायडर्स – २०२४ मध्ये +१.४२८
मुंबई इंडियन्स – २०२० मध्ये +१.१०७
मुंबई इंडियन्स – २०१० मध्ये +१.०८४
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – २०१५ मध्ये +१.०३७
किंग्ज इलेव्हन पंजाब – २०१४ मध्ये +०.९६८

हेही वाचा – IPL 2024 च्या प्लेऑफ्सचे चारही संघ ठरले! ‘क्वालिफायर वन’ आणि ‘एलिमिनेटर’ कोणत्या संघात होणार? जाणून घ्या

हे चार संघ ठरले प्लेऑफसाठी पात्र :

कोलकाता नाइट रायझर्स व्यतिरिक्त, आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चार संघांमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांचा समावेश आहे. या चारही संघांची यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी झाली. केकेआर संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या तर आरसीबी चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर यांच्यात होणार आहे. पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायझर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

हेही वाचा – IPL 2024 : ‘आता तुला कसं वाटतयं आई?’, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर यश दयाल व्हिडीओ कॉलवर भावूक

आयपीएल २०२४च्या प्लेऑफ्सचे वेळापत्रक:

क्वालिफायर-१: केकेआर विरुद्ध एसआरएच, २१ मे, अहमदाबाद
एलिमिनेटर: आरसीबी विरुद्ध आरआर, २२ मे, अहमदाबाद
क्वालिफायर -२: क्वालिफायर १ पराभूत वि एलिमिनेटर विजेता, २४ मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता ,२६ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,

Story img Loader