आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटाकडे जात असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला जबर धक्का बसला आहे. या संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कंबरेला दुखापत झाल्याने आरामाची गरज असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार कमिन्स ऑस्ट्रेलियमध्ये त्याच्या घरी म्हणजेच सिडनीमध्ये परणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. असे असले तरी हा संघ उर्वरित सामने पूर्ण ताकतीनिशी खेळणार आहे. असे असताना दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स संघातून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. याच कारणामुळे आराम करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामुळेदेखील कमिन्सला पूर्णपणे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने आता आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> वानखेडे स्टेडियमवर हे काय घडलं? पॉवर कटमुळे डीआरएस घेता आला नाही, ड्वेन कॉन्वे चुकीच्या पद्धतीने बाद

दरम्यान, या हंगामात पॅट कमिन्सची कामगिरी तेवढी चांगली राहिलेली नाही. त्याने ५ सामन्यांमध्ये फक्त ७ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्याने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे. मुंबईविरोधातील सामन्यामध्ये त्याने अर्धशतक झळकावून केकेआरला विजय मिळवून दिला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders bowler pat cummins leaving ipl due to hip injury prd