Shreyas Iyer fined 12 lakhs slow over rate : आयपीएल २०२४ मधील ३१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ गडी राखून पराभव केला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या उच्च धावसंख्येच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने २२३ धावांची मोठी धावसंख्या फलकावर लावली. यामध्ये अष्टपैलू सुनील नरेनचे महत्त्वाचे योगदान होते, ज्याने १०७ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरच्या नाबाद शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या पराभवानंतर केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला आणखी एक धक्का बसला आहे. त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२४ च्या ३१ व्या सामन्यात केकेआरचा राजस्थान रॉयल्सने दोन गडी राखून पराभव केला. या सामन्यात जोस बटलरने ६० चेंडूत नाबाद १०७ धावा करत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘स्लो ओव्हर रेटशी संबंधित आयपीएल आचारसंहितेच्या अंतर्गत हंगामातील हा त्याच्या संघाचा पहिला गुन्हा होता, त्यामुळे अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.’ राजस्थान रॉयल्सचा सात सामन्यांमध्ये सहावा विजय होता, तर केकेआरला सहा सामन्यांमधला दुसरा पराभव स्वीकारावा लागला.

Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा

जोस बटलरचे रेकॉर्डब्रेक शतक –

जोस बटलरने १०७ धावांची नाबाद खेळी साकारत आयपीएलमधील ७ वे शतक झळकावले, ज्यात त्याने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७८.३३ होता. त्याचबरोबर या हंगामातील त्याचे हे दुसरे शतक आहे. या शतकासह बटलरने अनेक विक्रमही मोडीत काढले. बटलरने सर्वाधिक आयपीएल शतकांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली होती. विराट कोहलीनंतर बटलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. आयपीएल २०२४ मध्ये झळकावलेल्या एका शतकासह, कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत ८ शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वल –

राजस्थान रॉयल्स संघ आतापर्यंत आयपीएल २०२४ मधील ७ सामन्यांतील ६ विजयांच्या जोरावर १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी, कोलकाता नाइट रायडर्स ६ सामन्यात ४ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरचे ८ गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांच्या नावावर ६ सामन्यांत ४ विजय आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ७ सामन्यांत केवळ एका विजयासह तळात आहे.