Kolkata Knight Riders: आयपीएल २०२४ दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला गेला. या सामन्यानंतर कोलकाताचा संघ चार्टर विमानाने लखनऊहून कोलकात्याला रवाना झाला. पण रात्री उशिरा खराब हवामानामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे विमान दोनदा लँडिंग करण्यात अयशस्वी राहिले आणि टीम कोलकात्याला पोहोचू शकली नाही.
कोलकातामध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अशा परिस्थितीत खराब हवामानामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे चार्टर विमान यशस्वी लँडिंग करू शकले नाही. त्यामुळे हे विमान परत वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते गुवाहाटीच्या दिशेने वळवण्यात आले. कोलकाता नाईट रायडर्सने स्वतः सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना हे अपडेट दिले. त्याच वेळी, दुपारी १:२० वाजता कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियावर आणखी एक अपडेट दिले आणि कळवले की गुवाहाटी ते कोलकाता उड्डाण केल्यानंतर KKR संघाला आणखी एक अयशस्वी लँडिंगला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचे विमान वाराणसीच्या दिशेने वळवण्यात आले.
कोलकाता नाईट रायडर्सने पहाटे ३ वाजता सोशल मीडियावर आणखी एक अपडेट शेअर केली. केकेआरने सांगितले की, संघ सध्या वाराणसीतील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. जो आज दिवसा कोलकाताला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांचा पुढचा सामना ११ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे.