Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Match Updates: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यात हैद्राबादने बाजी मारली. परंतु, हैद्राबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक पहिल्या षटकातच खूप महागडा ठरला. सनरायझर्स हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत हॅरी ब्रुकच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत २२८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूप खराब झाली. पहिल्या षटकात गुरबाज बाद झाला आणि चौथ्या षटकात वेंकटेश अय्यर आणि सनील नारायण तंबूत परतला. खराब सुरुवात झाल्यानंतर कोलकाताची टीम दबावात होती. पण पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात ६ चौकार ठोकले.
कोलकाता नाईट रायडर्सच्या सहाव्या षटकात उमरान मलिक गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने पहिल्याच षटकात खूप जास्त धावा दिल्या. नितीश राणाने आक्रमक फलंदाजी करत पहिल्या चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरही चौकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर राणाने गगनचुंबी षटकार मारत उमरान मलिकच्या पहिल्या षटकात २८ धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला सामन्यात वापसी करण्यास मदत झाली. मात्र, उमरानने दोन षटकात ३६ धावा देऊनही त्याला गोलंदाजीमध्ये समाधानकारक कामगिरी केल्यासारखं वाटलं. कारण २२८ धावांचा पाठलाग करणाऱ्या केकेआरने २० षटकात ७ विकेट गमावत २०५ धावा केल्या. त्यामुळे हैद्राबादचा या सामन्यात २३ धावांनी विजय झाला.
नक्की वाचा – IPL 2023: क्रीडाविश्वात खळबळ! ‘हा’ दिग्गज क्रिकेटर सट्टेबाजी प्रकरणामुळं अडचणीत?
सनरायझर्स हैद्राबादसाठी हॅरी ब्रुकने अप्रतिम फलंदाजी करत आयपीएल २०२३ मधील पहिलं शतक ठोकलं. या धावांचा जोरावर हैद्राबादच्या संघाला फलकावर दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. तसेच कर्णधार एडम मार्करमनेही वादळी खेळी करत २६ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कोलकाताच्या संघासाठी कर्णधार नितीश राणाने ४१ चेंडूत ७५ धावांची जबरदस्त खेळी केली. तसच रिंकू सिंगनेही या सामन्यात कमाल केली. रिंकूने ३१ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली.