Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Score Updates : ईडन गार्डनमध्ये यंदाच्या आयपीएल सीजनचा ९ सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाताने गुरबाज, शार्दुल ठाकूरच्या दमदार अर्शशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ७ विकेट्स २०४ धावांची मजल मारली होती. त्यानंतर दोनशे पार धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांची कोलकाताच्या फिरकीपटूंनी दाणादाण उडवली. सुनील नारायणने विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने आरसीबीच्या टॉप ऑर्डर फलंदाजांच्या दांड्या उडवल्या. कोलकाताच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळं आरसीबीचा पराभव झाला. आरसीबीचा आख्खा संघ १७.४ षटकात १२३ धावांवर गारद झाला आणि कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या विजयाचा नारळ फोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरसीबीसाठी सलामीला उतरलेल्या विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिसने चांगली सुरुवात केली होती. मात्र, सुनील नारायणच्या फिरकीने विराट कोहलीला २१ धावांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर कर्णधार डु प्लेसिस २३ धावांवर बाद झाला. आरसीबीचा संघ कठीण परिस्थितीचा सामना करत असताना चक्रवर्तीने पुन्हा एकदा फिरकीची कमाल दाखवली आणि ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेलला स्वस्तात माघारी पाठवलं. ग्लेन मॅक्सवेल ५ तर हर्षल पटेल शून्यावर बाद झाला.

त्यानंतर सुनील नारायणने शाहबाज अहमदलाही एका धावेवर बाद केलं. पण सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेयर सुयश शर्माने अधिक रोमांच वाढवला. अनुज रावत आणि दिनेश कार्तिकदा सुयशने बाद केल्यानंतर कोलकाताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. कोलकातासाठी सुनील नारायणे दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीने फिरकीची कमाल दाखवत चार विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. तर इम्पॅक्ट प्लेयरल सुयश शर्माला ३ विकेट्स मिळाल्या. विशेष म्हणजे या सामन्याचा खरा हिरो शार्दुल ठाकूरलाही एक विकेट मिळाली.