Lalit Modi Startling Accusation on CSK Owner N Srinivasan: इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी सचिव आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर पंच फिक्सिंग आणि लिलावात हेराफेरीसह अनेक गंभीर आरोप केले आहेत. २००८ ते २०१० दरम्यान आयपीएलचे संस्थापक आणि आयुक्त असलेले ललित मोदी यांनी आरोप केला की श्रीनिवासन यांना फ्रँचायझी लीग यशस्वी होईल असे वाटत नव्हते, परंतु टी-२० स्पर्धा ब्लॉकबस्टर ठरली तेव्हा त्यांनी त्यात उडी घेतली.

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बीसीसीआयचे माजी सचिव एन श्रीनिवासन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एन श्रीनिवासन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या पंचांची नियुक्ती करत होते, असा दावा त्यांनी केला. अँड्र्यू फ्लिंटॉफसाठी आयपीएलच्या लिलावातही फिक्सिंग झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ICC Test Rankings: बुमराह नंबर वन कसोटी गोलंदाज, यशस्वी जैस्वालची कारकिर्दीतील उत्कृष्ट रँकिंग, ICC क्रमवारीत भारताचा दबदबा

ललित मोदी यांनी अलीकडेच राज शामानी या यूट्यूब चॅनलशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “त्यांना (एन श्रीनिवासन) आयपीएल आवडत नव्हते; आयपीएल यशस्वी होईल असे त्यांंना वाटले नव्हते, पण जेव्हा आयपीएलला सर्वांचा जोरदार प्रतिसाद मिळाला तेव्हा सर्वजण त्यात सामील झाले. ते बोर्डाचे सदस्य आणि सचिवही होते, त्यामुळे ते माझे सर्वात मोठे विरोधक होते. जेव्हा मी त्याच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा त्यांंनी अनेक गोष्टी केल्या, पंच फिक्सिंग केले.”

ललित मोदी म्हणाले, “यासाठी मी त्यांच्यावर आरोप केले. ते पंच बदलत असत आणि मी त्याबद्दल गोष्टींचा विचार केला नाही. पण नंतर मला कळले की ते चेन्नईच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या पंचांची नियुक्ती करत आहेत, ही माझ्यासाठी समस्या होती. याला फिक्सिंग म्हणतात, म्हणून जेव्हा मी हे प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पूर्णपणे माझ्या विरोधात गेले.”

हेही वाचा – Prithi Shaw IPL Auction: पृथ्वी शॉने IPL लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘ट्रोलिंगच्या पोस्ट मी पाहतो पण…’

ललित मोदींनी श्रीनिवासन यांच्यावर इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफसाठी बोली लावण्यासाठी फिक्सिंगचा आरोपही केला. ते म्हणाला की, “त्यांनी इतर प्रत्येक संघांना खेळाडू (अँड्र्यू फ्लिंटॉफ) साठी बोली लावू नये असे सांगितले होते. ललित मोदींनी सांगितले की, त्यांना चेन्नई सुपर किंग्जमध्ये फ्लिंटॉफ हवा होता, पण लिलावातच त्याला संघात विकत घेतल्याचे श्रीनिवासन यांना दाखवायचे होते.”

हेही वाचा – Rishabh Pant: ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा

ललित मोदी म्हणाले, “मी फ्लिंटॉफला श्रीनिवासन यांना लिलावात घेऊ दिले. होय, आम्ही ते केले. यात शंका नाही, प्रत्येक संघाला याची कल्पना होती.’ ललित मोदी म्हणाले, ‘श्रीनिवासन आयपीएल सुरू होऊ देणार नव्हते, ते याच्यातला मोठा अडथळा होते. या कारणामुळेच अँड्र्यू फ्लिंटॉफसाठी बोली लावू नका असे मी सर्वांना सांगितले.”

ललित मोदी म्हणाले, ‘हो, मी ते केलं कारण श्रीनिवासन म्हणाले की मला अँड्र्यू फ्लिंटॉफ हवा आहे. पण जेव्हा तुम्ही आयपीएलसारखी मोठा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करत असाल… आणि मी ते एकट्याने केलं आहे,… तेव्हा तुम्हाला प्रत्येक अडथला दूर करावा लागतो, खेळासाठी काय मोठं आहे. प्रत्येक खेळाडू फक्त तीन महिन्यांसाठी असतो.