सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाइट रायडर्ससमोर १७८ धावांचे आव्हान उभारले आहे. मात्र, वरुणराजाच्या आगमनामुळे राजस्थानच्या फलंदाजीची अद्याप सुरूवात होऊ शकलेली नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबविण्यात आला आहे.
दरम्यान, कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत हैदराबाद सनरायझर्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ५५ चेंडूत ९१ धावा ठोकल्या. यामध्ये ९ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांचा समावेश आहे. वॉर्नरच्या स्फोटक खेळीला शिखर धवनने देखील साजेशी साथ दिली. धवनने ५४ धावांचे योगदान दिले. तर, रवी बोपारा केवळ २ धावांवर बाद झाला. वॉर्नरच्या ९१ धावांच्या बळावर हैदराबादला १५० चा पल्ला गाठता आला. कोलकाताकडून वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने दोन तर उमेश यादव आणि रसेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत हैदराबाद सनरायझर्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ५५ चेंडूत ९१ धावा ठोकल्या.
First published on: 22-04-2015 at 05:36 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live score ipl 8 sunrisers hyderabad vs kolkata knight riders