IPL 2025 LSG vs GT Match Highlights in Marathi: लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला पराभवाचं पाणी पाजत त्यांचा विजयरथ रोखला आहे. आयुष बडोनीचा अखेरच्या षटकातील चौकार आणि षटकारासह लखनौने ६ विकेट्सने शानदान विजय नोंदवला आहे. लखनौकडून एडन मारक्रम आणि निकोसल पुरन यांनी अर्धशतकं झळकावली. तर गुजरातकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सलामीला उतरल्यावर १२० धावांची विक्रमी भागादारी रचली.
लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना गिल-सुदर्शनच्या जोडीने १२० धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत गुजरातला १८० धावांवर रोखलं.
गुजरातने दिलेल्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात खूपच चांगली झाली. कर्णधार ऋषभ पंत बऱ्याच काळानंतर सलामीला उतरला होता. पंत आणि एडन मारक्रमच्या जोडीने पॉवरप्लेमध्ये ६० धावा करत चांगली सुरूवात केली. मारक्रमने अर्धशतकी खेळी केली तर ऋषभ पंत फार मोठी खेळी करू शकला नसले तरी त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली. विस्फोटक फलंदाज निकोलस पुरन ६० धावा करत बाद झाला.
मारक्रमने ३१ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. तर ऋषभं पत ४ चौकारांसह २१ धावा करत बाद झाला. तर निकोलस पुरनने आपला विस्फोटक अंदाज कायम ठेवत ३२ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. तर आयुष बडोनीने २० चेंडूक २ चौकार आणि एका षटकारासह २८ धावांची खेळी करत संघासाठी विजयी षटकार लगावला.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने वादळी सुरूवात केली. गिल आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतक झळकावली. गुजरातचे फॉर्मात असलेले सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी १२० धावांची भागीदारी रचली आणि संघाची धावसंख्या १२ षटकांत १२० वर नेली. पण यानंतर संपूर्ण चित्र पालटलं. जिथे गुजरातने १२ षटकांत १२० धावा केल्या होत्या. यानंतर ८ षटकांत लखनौने ८ विकेट्स घेत फक्त ६० धावा दिल्या.
आवेश खानने गिलला लखनौ १२० धावांवर असताना झेलबाद केलं आणि यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं. यानंतर पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने दोन विकेट्स घेतले. यानंतर सातत्याने विकेट्स गमावले तर शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकात दोन विकेट्स घेत गुजरातला मोठी धावसंख्या रचू दिली नाही. शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३४ धावा देत २ विकेट्स घेतले. तर बिश्नोईने ३ षटकांत ३३ धावा देत २ विकेट्स घेतले. तर दिग्वेश राठी आणि आवेशने १-१ विकेट घेतली.